Saturday, October 25, 2008

ठाकरे की Thackeray - २

रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मुंबईत मारहाण केली गेली. या उमेदवारांची काय चूक होती? नोकरीच्या आशेने ते जेथे बोलवले तेथे आले होते.
जर मराठी वृत्तपत्रांत खरोखरच जाहिरात आली नसेल तर चूक असलीच तर ती रेल्वे बोर्डाचीच होती. या उमेदवारांची त्यात काय चूक होती? रेल्वे बोर्डाच्या यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला गाठून जाब विचारण्याऐवजी या उमेदवारांनाच मारहाण करणे सुसंस्कृत (sorry, राज ठाकरे आणि त्यांच्या सेनेकडून
सुसंस्कृतपणाची अपेक्षा जरा जास्तच आहे) माणसाला लज्जास्पद नाही का? विचार करा, असाच प्रकार आपल्या मुलाबाबत परप्रांतात झाला तर? आपल्याच बस जाळणे म्हणजे मराठी माणसाचेच नुकसान नाही का? http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=15&contentid=2008102220081022034449255edf6f445
त्या दिवशी बांद्रे न्यायालयात ज्यांच्या केस होत्या त्यांचे किती हाल झाले ते त्यांनाच माहीत! इतरांनाही इस्पितळात जाता/नेता न आल्याने, महत्त्वाच्या कामाला बाहेर न पडता आल्याने कितीकांना गैरसोय सहन करावी लागली. राष्ट्रीय संपत्तीचे जाळपोळीने किती नुकसान झाले! कामाचे तास किती वाया गेले! पण ’राज’ सैनिकांना त्याचे काय? त्यांचा या कश्यासीही काही घेणे देणे नाही.

आजकाल या दंगलखोरांची एक नविनच जमात तयार झालीय. कालच माझ्या आत्याशी बोलत असताना दोन आठवड्यापुर्वी झालेल्या दंगलीबद्द्ल चर्चा चालू होती. त्यावेळी तिने जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवणे खरच खुप कठीण आहे. आत्यचा देवपूर (धुळे) मधील दुकानाशेजरील दोन दुकाने फक्त लूटण्यासाठी फोडण्यात आली. संपुर्ण दुकान लुटून खाली झाल्यानंतर पेटवून देण्यात आले. मुंबईतील दंग्यानंतर असे काही झाल्याचे ऎकिवात आले नसले तरी झाले नसेलच असे नाही

to be contd ....

No comments: