Monday, October 13, 2008

माणसे अरभाट आणि चिल्लर

<जी ए. कुलकर्णी>

<माणसे अरभाट आणि चिल्लर><विष्णू गजानन परचुरे>एकूण पाने :- 18

FROM 9 TO 26

पान नं:- 9

+

आता यापुढे इंग्रजी शाळेत जायचे म्हणताच मी अगदी हादरून गेलो होतो,

पण तरी त्याबद्दल उतावीळ देखील झालो होतो. आधीची

म्युनिसिपालिटीची शाळा अगदी अंगवळणी पडून गेली होती, आणि शाळा

म्हटले की परूळेकर मास्तरांखेरीज कुणीच डोळ्यांसमोर येत नसे.

ऊनपाऊस असो अगर नसो, परूळेकर मास्तर नेहमी छत्री वापरत व वर्गात

आल्यावर ती ते फळ्याजवळच्या कोपऱ्यात ठेवत. ती मनाप्रमाणे व्यवस्थित

ठेवण्यास त्यांना बक्कळ पाच मिनिटे लागत. अगदी लहान पोरांखेरीज

सारेच जण ज्याला लक्कड म्हणत तो लखू तोपर्यंत फळा पुसून ठेवत असे,

व खडूची पूड भरलेले फडके त्याचा विशेष राग असलेल्या पोरांच्या

तोंडासमोर फडफडवत असे. मग तीन-चार उदाहरणे होत. त्यानंतर

कविता सगळ्यांनी मिळून म्हणायच्या असत. त्या वेळी काही पोरे तोंड

उंघडे ठेवून शुंभासारखी उभी राहत, किंवा उगाचच तोंड हलवत. नंतर

मास्तर महादेव कणेरीला बोलावत. साऱ्या वर्गाला शुध्दलेखन घालायला

सांगत. ते स्वतः बाहेर जात, आणि चहा घेऊ परत आल्यावर खुर्चीत

बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागत.आमच्या वर्गात आठदहा पोरांचा एक फर्मास घोळका होता. ते सगळे जण

जमिनीवर रेघोटया मांडून चिंचोक्याचा खेळ खेळत. आंब्याच्या दिवसांत

केऱ्यां-मीठ खायची हीच वेळ असे. पुष्कळदा समोरील बिगर इयत्तेतील

छोटया पोरांना खिडकीतून खडे मारायची गंमत करण्याची हीच वेळ होती.

वर्गात अगदी दाराशीच नामदेव खटावकर बसे. त्याच्याजवळ एक मोठी.

छडी होती. हेडमास्तर जिना चढून वर येणार असे दिसले की, तो छडी

जोराने कपाटावर हाणू लागे. परूळेकर जागे होत व लगबगीने फळ्याजवळ

जाऊन उभे राहत आणि काही तरी नाटकी लिहू लागत. सगळे चिंचोके,

बसण्यासाठी फळ्या घातलेल्या असत, त्याखाली जात. हेडमास्तर येऊन

गेले की मग आमचे सारे लक्ष घंटेकडे असे. हेडमास्तर आपले घडयाळ

घरी तरी विसरत, किंवा ते बंद तरी पडलेले असे. म्हणून ते निंगू पाटलाला

कोपऱ्यावरच्या शेटजींच्या दुकानात वेळ पाहून यायला सांगत परत

आल्यावर निंगू हटकून दहाबारा मिनेटे जास्तच सांगे. पण मास्तरांना घरीपान 10जायची घाई असली तर ते त्याच्यावर खेकसत, ""जा पुन्हा बघून ये पोस्टात

जाऊन. शेटजीचे घडयाळ मालकाप्रमाणेच नुसते बूड ओढणारे आहे."" निंगू

धावत जाऊन पाहून येई, आणखी पाच-सात मिनिटे वाढवून सांगे आणि

मग पितळी तबकडीवर लाकडी हातोडा दणादणा बडवू लागे. यापेक्षा शाळा

काही निराळी असते याची आम्हांला कल्पनाच नव्हती.इंग्रजी शाळेविषयी आम्हांला पहिली जबरदस्त माहिती मिळाली, ती म्हणजे

वर्गाला सर्वच विषयांना एकच मास्तर नसतात. दर तासाला नवे मास्तर

भूगोलाचे निराळे, मराठीचे निराळे. त्याशिवाय बसायला पुढे डेस्क

असलेली बाके अगर लांब जोडलेल्या खुर्च्या असतात. मी फर्स्ट `बी' मध्ये

गेलो. त्या वेळी बरीच पोरे आधीच वर्गात येऊन बसली होती. मी आणि

परशुराम खुर्च्यावर बसलो, पण त्यांच्या अगदी अरूंद फळ्यांवर आम्हांला

बसता येईना. आम्ही तसाच तोल सावरत कळ काढली. पुढल्या तासात

देशपांडे मास्तर आले. आम्हांला पाहताच ते समोर येऊन उभे राहिले व

कमरेवर हात ठेवून आम्ही बेडूक असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहू लागले.

ते म्हणाले,""अहो, सिंहासनवाले, खुर्चीवर सरळ बसता येत नाही की काय

तुम्हा विक्रम राजांना ?"" त्यावर सगळी पोरे फिसकल्याप्रमाणे हसू लागली.

मग एकाने सांगितले,""अरे खुर्चीची फळी खाली टाक नि मग बस.""

आमच्या खुर्च्या घडीच्या होत्या. आम्ही अगदी ओशाळून गेलो.मला वाटले होते, मी इंग्रजी शाळेत गेल्यावर आमच्या वर्गाला दातार

मास्तर येतील. ते आमच्या घरापासून आठदहा घरेच सोडून राहत.

आमच्या घरी त्यांची चांगली ओळख होती. पुष्कळदा आजोबा करंदीकर

आणि अप्पा काळे आले की आमच्या घरी त्यांच्या तास न्् तास गप्पा चालत.

व दादा त्यांना अर्ध्या अर्ध्या तासाने चहा विचारत. पण मी आतून चहा

आणून त्यांच्यासमोर ठेवला की, तेथून माझी हकालपट्टी होत असे. पण

मास्तर सकाळी शाळेत जायला सायकलीवरून निघाले की आम्ही

पाच-सात पोरे त्यांच्या मागोमाग जात असू. मास्तर कधी सरळ सीटवर

बसत नसत. रस्ता थोडा चढ असल्यामुळे पिनवर पाय ठेवून ते उड्या

मारत मारत जात व मग मध्येच उंच होऊन एखादी शिकार पकडावी

त्याप्रमाणे सीट पकडत, आणि त्या वेळी चावट पोरे टाळ्या वाजवत.

मास्तर निदान अर्धी गल्ली तरी अशा उड्या मारतच पार करत. दादा तर

म्हणायचे,""हा किटू अशाच उडया मारत आणखी थोडा पुढे गेला कीपान नं. 11

शाळेतच जाऊन पोहोचेल. मग सीटवर बसण्याची गरजच राहणार नाही.""दातार मास्तरांमुळे तर दादांनी ही शाळा माझ्यासाठी निवडली होती. पण

पहिल्या तीन-चार वर्षांत मास्तर आमच्या वर्गाला आलेच नाहीत. कधी तरी

भूगोल अथवा शास्त्र असल्या विषयाच्या बदली तासाला येत. पण मग ते

आम्हांला काही तरी लिहायला सांगत इतकेच.मास्तरांच्या स्वतःच्या शिक्षणाची झालेली परवड आम्हा सगळ्यांना माहीत

होती. शाळेत वार्षिक परीक्षा आली की, आई किंवा वडील हटकून आजारी

पडत व औषधपाण्यातच त्यांचे वर्ष फुकट जात असे. आपल्या हयातीतच

मास्तरांनी बी.ए. व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती. पण ते

मात्र घडले नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदी विषय घेऊन बनारसला जाऊन

मास्तर बी.ए. झाले व मोठया कष्टाने मिळवून टिकवून धरलेली त्यांची

नोकरी सुसूत्र झाली. ""तुमचे पेपर कले गेले ?"" असे अनेकदा मास्तर

विद्यार्थ्यांना विचारतात, पण खुद्द मास्तरांनाच तसे विचारण्याची संधी

आम्हांला मिळाली. आम्ही तसे विचारले तर दातार मास्तर हसून म्हणत,

""कसे गेले म्हणजे काय ? गेले एका लहान पेटाऱ्यांतून !"" ते पास झाले हे

समजताच आम्ही गोंगाट करून त्यांच्याकडे पेढे मागू लागलो. एरव्ही

मास्तरांनी म्हटले असते, "" आता जर आवाज कराल तर भोपळ्यांनो, तुम्हा

सगळ्यांनाच पाठवीन प्रिन्सिपालकडे. तेथे मग मिळतील वाट्टेल तेवढे पेढे !""पण त्या दिवशी मासतरांचे मन ठीक दिसत नव्हते. त्यांनी खिशातून

हातरूमाल काढला, पण तो तपकीर पुसण्यासाठी नव्हे. तपकिरीचा

हातरूमाल वेगळा होता. हा छोटा व स्वच्छ होता. ते खिडकीपाशी गेले व

आमच्याकडे पाठ करून डोळे टिपून परतले. तरी सुध्दा त्यांचे डोळे

अद्याप नानू बापटाप्रमाणे ओले होते. मग मात्र आम्ही खाडकन गप्प झालो

व काही तरी वाचण्याचे ढोंग करू लागलो.आमच्यापेकी काही जणांना मास्तरांचा एक विशेष जबरदस्त वाटे. दुसऱ्या

शाळेतील आमचे दोस्त भेटले की आम्ही ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांच्या

नजरेस आणत होतो. पुसत्कावर किंवा पुस्तकात कुठे तरी ज्याचे नाव

छापलेले आहे, तो लेखक मेलेलाच असतो, अशी समजूत करून घेण्याचे

ते वय. पण मास्तरांमुळे बोलणारा चालणारा असा एक लेखक प्रत्यक्षपान नं. 12

पाहण्याचा अनुभव आम्हांला मिळाला होता. दातार मास्तर म्हणजे न

दुखवता हळूच कान पिरगळणारे, किंवा ""अरे भोपळ्या !"" म्हणत

बिनशिंगाचा राग दाखवणारे नुसते मास्तर नव्हते. मास्तर लेखक व कवी

होते. त्यांचे चार-सहा लेख आणि बऱ्याच कविता प्रसिध्द झाल्या होत्या. ते

लेख किंवा त्या कविता मला कधी पाहायला मिळाल्या नाहीत, पण आपल्या

एका छोटया नाटकाची प्रत मात्र त्यांनी मला दिली होती. देह-घर नावाच्या

घरात अनेक आगंतुक माणसे घुसून राहिली होती. एकाचे नाव होते खादाड.

तो सदोदित काही खात असे. दुसरा एक जण होता त्याचे नाव होते आळशी

व तो नेहमी जांभया देत असे. आणखी एक जण झोपाळू नावाचा होता तो

नेहमी झोपून आडवा पडलेला असे, त्यामुळे त्याला नाटकात फारशी

भाषणे नव्हतीच. अशीच आणखी थोडी माणसे त्या घरात राहत होती. एक

दिवस त्या घराचा मालक उद्योगराव येतो व छडीने बडवत सगळ्यांना

हाकलून घालतो, आणि मग घर सुखाने शोभू लागते. या नाटाकाच्या

जोडीला मास्तरांनी सुबोध रामायण देखील लिहिले होते व त्यात त्यांची

स्वतःची पाच चित्रे छापली होती. त्यांनी लिहिलेल्या दोन गाण्यांची तबकडी

सुध्दा निघाली होती. ती गाणी त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या मालती

जांभेकरने म्हटली होती. त्या काळी रेकॉर्ड निघणे किंवा रेडिओवर कार्यक्रम

मिळणे ही गोष्ट फार दुर्मिळ व डोळे दिपवणारी होती. आज रेडिओ आर्टिस्ट

पेशाला मण भेटतात.मालती जांभेकरचा एक कार्यक्रम रेडिओवर झाला म्हणून सुनंदा कामत

तर आपल्या खोलीत बसून तेथेच चहा-जेवण मागवू लागली, आणि

महिनाभर आपल्या जुन्या मेत्रिणींशी बोलली नाही. जांभेकरांना सगळ्या

मुलीच होत्या व गल्लीत सारे जण त्यांना ""हाच मुलींचा बाप"" म्हणत.

मालती ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. ती स्वभावाने मुळातच थोडी जादा

होती. आपणाला इतरांपेक्षा निराळी हवा श्वासोच्छ्वासासाठी लागते हे

दाखवण्यासाठी ती नेहमी नाक वर करून चाले. आकाशाला नाक

लावण्याची जर एखादी स्पर्धा असती तर मालतीला कायम बक्षीस मिळत

गेले असते ! पण या साऱ्याबद्दल आमचा तिच्यावर काहीच राग नव्हता. एक

तर की आमच्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी होती,आणि तिला तो तोरा

थोडा शोभूनच दिसे. तिचा आवाज साखरपाकाच्या तारेसारखा होता आणि

ती समोरून गेली की एखादा छबिना गेल्याप्रमाणे वाटे. शिवाय तीपान नं. 13

खरोखरच बुध्दिमान होती.नंतरच्या आयुष्यात तिने सगळ्या परीक्षांत

फटाफट फर्स्टक्लास मिळवले, आण ती पुण्याच्या एका कॉलेजात

प्रोफेसर झाली. बोटावर मोजण्याइतकीच कॉलेजे असताना त्यांतील

एखाद्या खानदानी कॉलेजात प्राध्यापक होणे हे छाती दडपून

टाकण्याइतकेच यश होते. त्या वेळी आनंदाने व्याकुळ झालेल्या

जांभेकरांचा चेहरा मला आज देखील आठवतो. स्वतः मँट्रिकपलीकडे जाऊ

न शकलेल्या या माणसाचे पाय जमिनीवर ठरेनात. या वेळी त्याने घरी

जाऊन काय वाटले असेल -पेढे ? छट््. त्यांनी गल्लीतील प्रत्येक घरात

वाळ्याची एकेक लहान जुडी नेऊन दिली. यापेक्षा मूठभर दुर्वा देणे कमी

खर्चाचे झाले असते अशी काही जणांनी त्यांची थट्टा केली. एकाने तर

नारळाची शेंडी घरोघरी वाटणे हाच उत्तम मार्ग ठरला असता, असे सुध्दा

सांगितले. कळवळलेल्या चेहऱ्याने जांभेकर आमच्या घरी आले व थोडा

वेळ दादांबरोबर बोलत थांबले. ते फार खजील झाले होते. तरी ते शांतपणे

म्हणाले,""भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा, आणि देऊन देऊन

प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे."" मालतीने नंतर तीन-चार पुस्तके देखील

लिहिली, पण ती नंतरची गोष्ट आहे.आता एक लेखक, कवी व नाटकार म्हणून दातार मास्तरांविषयी

आम्हांला उदंड अभिमान होता, व पुस्तकावर असलेले त्यांचे छापील नाव

पाहून आम्हांला फार हेवा सुध्दा वाटे.पहिली तीन वर्षे कशी गेली कोणास ठाऊक ! पण प्रत्येक वर्षी दोन-तीनदा

तरी वर्गातून बाहेर जावे लागले, हे मात्र मला आठवते. सडेकर मास्तर

मराठी घेत व निबंध लिहायला सांगत. त्यांचे विषय चांगलेच ऐसपेस असत.

आणि त्यांचा संबंध सगळ्या जगाशी किंवा बाजार उतरला तरी निदान

अखिल भारताशी असे. भारतातील बेकारी कशी नाहीशी होईल ? युध्दे

कशी थांबतील ? देशभक्ती इत्यादी. त्यांचे सगळेच विषय आमच्या

आवाक्याबाहेर असत व त्यांच्याविषयी आम्हांला काहीच आवड वाटत नसे.

आज चाळीस-पन्नास वर्षांनंतर देखील जगातील युध्दे थांबवण्याचा मार्ग

मला मिळालेला नाही. आमच्या शेजारच्या पांगळ्या मधुकरला त्याला कुठे

खेळायला जाता येत नाही, म्हणून त्याच्या वडिलांनी एक छोटा कुत्रा आणून

दिला. तो एकदा उंबऱ्याबाहेर गेला. मधू पुढे सरकून त्याला आवारायच्या

आत तो रस्त्यावर गेला व एका सारवटाखाली सापडून चिरडून गेला.पान नं. 14

आमचा पोपट एकदा मांजराने मारला. याविषयी लिहायला मला आवडले

असते. एकदा भीत भीत मी सडेकर मास्तरांना विचारले. तेव्हा ते खेकसून

म्हणाले, ""तुझ्या पोपटाची हकीकत ऐकायला सारं जग वाट पाहत आहे

असा कोण लागून गेला आहेस रे तू दीड बाजीराव ?"" ते ऐकून प्रभाकर,

तातू सामंत, नानू बापट यांनी तोंडे घट्ट मिटून ठेवली. प्रभाकरला त्याच्या

घराजवळ असलेल्या सात चिंचांच्या झाडांविषयी लिहायचे होते. मुद्दाम

लावल्याप्रमाणे ती गोलाकार रेषेत वाढली होती. अनेकदा मी प्रभाकरबरोबर

त्यांच्या त्या गर्द सावलीत जाऊन बसत असे. तेथील सावली देखील

किंचित हिरवट दिसायची व तिला चिंचेच्या कोवळ्या पानांची, फुलांची चव

आहे असे वाटून जीभ शिवशिवू लागे. तेथे गेल्यावर काही करावे, खेळावे,

बोलावे असे वाटतच नसे. नुसते बसावे अगर आभाळावर चिंचपानी नकशी

पाहत अंग पसरावे असे वाटे. प्रभाकरचे वडिल हातभर उंच होते तेव्हा

देखील ही झाडे अशीच खानदानी आणि पोक्त दिसायची असे ते सांगत.

मग काय झाले कुणास ठाऊक ? म्युनिसिपालिटीने ती झाडे तोडून त्या

ठिकाणी दवाखाना बांधण्याचे ठरवले. मग प्रभाकरने आईकडून छोटे नेवेद्या

करून घेतले व प्रत्येक झाडापुढे ठेवले. त्याचे आईवडिल रात्री त्या ठिकाणी

गेले व तेथे एक पणती लावून परतले. रात्रभर आईच्या डोळ्यांतले पाणी

थांबले नाही. झाडावर पहिली कुऱ्हाड पडण्याच्या आधीच प्रभाकरच्या

वडिलांनी ते घर सोडले व ते किल्ल्यात राहायला गेले. तातू सामंतला

आपल्या थोरल्या भावाविषयी लिहायचे होते. त्याने त्या भावाला पाहिले

सुद्दा नव्हते, कारण त्याच्या जन्माआधीच तो वारला होता. पण त्याची आई

त्याला त्याच्याविषयी सतत सांगत असे. तिने त्याचे जुने कपडे, त्याची

पाटी, त्याचा भोवरा-सारे अगदी जपून ठेवले होते. नानू बापट देखील

मधून मधून आमच्याच येऊन बसत असे. पण तो सतत कुठल्या तरी एका

नदीविषयीच बोलत असे, त्यामुळे आम्हांला फार कंटाळा येई. त्याच्या गावी

एक नदी होती. तिच्याकडे पाहत काठावरच्या एका दगडावर बसले की

तिच्या पाण्याबरोबर आपण सुध्दा वाहत जात आहो, नव्या प्रांतात, देशांत

चाललो आहो, असे त्याला वाटे. एकदा तर तो नदीबरोबर इंग्लंडला देखील

गेला होता म्हणे. पण एकदा काही तरी विलक्षण घडले. नदीवर ऊन पडले

की पाण्यात झगझगीत जरीतुकडे दिसत. एकदा ते सगळे एकदम डोळे

झाले व नानूकडे रोखून पाहू लागले. तो घाबरून उठला तेव्हा कुणी तरी

मोठयाने हसले. ते सांगत असताना देखील नानू भेदरायचा. शेवटी हटकूनपान नं. 15

त्याचा प्रश्न असे, ""कोण हसले असेल त्या वेळी ?""एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : ""प्रयत्न वाळूचे कण

रगडिता ... "" रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर

सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; `उद्योगाच्या घरी ऋध्दी सिध्दी

पाणी भरी '... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर: माहितीचा कागद असतो,

त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून

आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही दोनदा लिहिले

देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास

ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : ""प्रयत्ने वाळूचे

कण -"" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच

नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर

देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची

उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानेलेल्या माणसाची (एखाद्या वेळी)

तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा

थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे ह्दय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून

ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट

अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला

पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरूवातीला शिंकलेच पाहिजे

असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे.""मास्तरांनी छद्मी आवाजात माझा निबंध वर्गात वाचून दाखवला. पोरे

फिदीफिदी हसली. ते म्हणाले,""जादा शहाणपणा दाखवू नको. निबंध पुन्हा

लिहून आण आणि आता येथून चालता हो."" त्यांनी मला वर्गाबाहेर घालवले.

निबंधाची वही घेण्याची तसदी देखील त्यांनी वाचविली, कारण मी

वर्गाबाहेर पडल्यावर त्यांनी ती वही फर्रदिशी बाहेर फेकली. बऱ्याच

उशीरापर्यंत जागून लिहिलेल्या त्या निबंधाबद्दल मी घरी मात्र काही

बोललो नाही.पण मला नेहमी नवल वाटायचे ते एका गोष्टीचे. दिवेकर तिसरीत दोनदा

नापास झाला होता. जाधव गणितात उत्तम होता, पण त्याला इंग्रजी येत

नसे. त्या दोघांचे होमवर्क अनेकदा मीच करून देत असे. पण निबंधात मात्र

त्यांना नेहमी दहापेकी आठ-नऊ मार्क पडत. एक दिवस मी रागारागानेपान नं. 16

त्यांना विचारले, तर ते एकमेकांना ढकलत हसतच राहिले. मग दिवेकर

म्हणाला, ""तू माझा जिगरी दोस्त म्हणून सांगतो. यातली ग्नानबाची मेख

अशी आहे बघ. माझ्याकडे दोन वर्षांच्या जुन्या वह्या आहेत. जाधवचे दोन

भाऊ येथेच शिकून गेले. त्यांच्या वह्या त्याच्याजवळ आहेत. सडेकर

मास्तरांचे सहा-सात विषय ठरलेले असतात, भारतातील बेकारी, युध्दे

कशी थांबतील, दारूबंदी, प्रयत्ने वाळूचे, जातिभेद, खेडयातील जीवन. दर

खेपेला आम्ही तेच जुने निबंध उतरून काढतो. मास्तर कधी तरी दोनचार

वह्या पाहतात, आणि बाकीच्या वह्या त्यांची बायको तपासते. म्हमून आम्ही

आमच्या निबंधावर दहापेकी आठ किंवा नऊ मार्क सुध्दा लिहून ठेवतो.

मास्तरांना वाटते, बायकोने आधीच मार्क दिले आहेत, तर बायकोला वाटते,

मासत्रांनी या वह्या आधीच तपासलेल्या आहेत. आता बघ पुढल्या खेपेला

देशभक्ती हा विषय येतो की नाही ते !""पण दिवेकराचा अंदाज चुकला. मास्तरांनी यो खेपेला खेडयांतील जीवन

हा विषय दिला आणि या खेपेला दिवेकर-जाधव यांच्या जोडीला माझी

देखील तिसरी मोट कुरकुर आवाज करत चालू लागली, व आमच्या

सगळ्यांना गोठयांतून गाई-वासरे हंबरू लागली.भूगोलाला कुलकर्णी मास्तर होते. त्यांनी देखील एकदा मला वर्गातून

हाकलले. ते अतिशय नाकातून बोलत. आमचा एक महिना तोंड गच्च दाबून

धरून त्यांच्या बोलण्याची सवय करून घेण्यातच गेला. पण ते काय

सांगतात हे ऐकण्याऐवजी ते कसे सांगतात हे पाहण्याची वृत्ती मात्र गेली

नाही. आमच्या वर्गाला अगदी दरवाज्यापासून दुसऱ्या भितींपर्यंत मोठा

सिमेंट बोर्ड होता. एकदा ते दरवाज्याजवळ उभे राहिले व हात जोडून त्यांनी

बोर्डाच्या वरच्या कोपऱ्यापर्यंत. नेले. मग त्यांचा गुंजारव सुरू झाला.""गंगा येथे उगम पावते, मग ती अशी हिमालयातून खाली येते."" त्यांनी

जोडलेले हात खाली आणून ओंजळ समोर धरली व गंगेचा प्रवास दाखवत

ते पुढे निघाले. वाटेत ते खुर्ची सरकवून प्लँटफॉर्मवर चढले व तो ओलांडून

पलीकडे उतरले व सरकत सरकत शेवटी बोर्डच संपला. तेथपर्यंत आले

व त्या ठिकाणी तळवे उघडून ""या ठिकाणी गंगा समुद्राला मिळते,"" असे

त्यांनी सांगितले. आता बोर्डच संपला म्हणून गंगा नदी त्यांच्या आवाजातून

निसटून धावत समुद्रात गेली. त्यांच्या इतक्या आवाजाच्या सवयीनंतरहीपान नं. 17

मला हसू आवरले नाही. तेव्हा गंगेला सासरी पोचवल्यावर टेबलावर छडया

हाणत त्यांनी मला वर्गाबाहेर हाकलले.खरे म्हणजे संस्कृतचे दामले मास्तर सावरी कापसाची आठवण व्हावी असे

गुबगुबीत व सौम्य दिसत. ते जुनेच नव्हेत,तर प्राचीन होते. त्यांना वाढवून

दिलेली दोन वर्षांची मुदत देखील आता संपत आली होती.ते फार सौम्यपणे बोलत व रूईची केळ फुटल्याप्रमाणे त्यांच्याकडून शब्द

येत. साऱ्या आयुष्यात त्यांनी कधी कुणाला कठोर शब्द वापरला नसेल,

पण त्यांच्याकडून देखील मी एकदा हाकलला गेलो. खरे म्हणजे ते एक

रेकॉर्डच होते.मास्तर स्वतः थोडे सद््गदित होऊन धर्मराजाविषयी बोलत होते.

पांडवांमध्ये धर्मराजाविषयी मला कधी फारसे आकर्षण वाटले नाही व

त्याच्याविषयी जास्त माहिती करून घेण्याची कधी इच्छा झाली नाही.`नरो

वा कुंजरो वा' हा एकच क्षण त्याच्या आयुष्यात नाटयमय ठरला. पण त्या

क्षणातील क्रौर्य, कारूण्य ही कधी त्याला जाणवली होती की काय कुणास

ठाऊक ! धर्मराज म्हणताच त्या वेळी माझ्यापुढे एकच चित्र येत असे. संत

चित्रपटांतील संत ज्याप्रमाणे हनुवटी वर करून डोळे ओलसर करून

घोगऱ्या आवाजात बोलणारा, भक्ती, सत्य, स्न्मार्ग, कर्तव्य असल्या

शब्दांखेरीज एक वाक्य न बोलणारा, उपदेशाची एकही संधी न सोडणारा,

नातीचे नाक पुसताना देखील उपनिषदांतील एक अवतरण दिल्याखेरीज

न राहणाऱ्या आचार्यांची जी एक पेदास नंतर दिसू लागली होती

त्यांतील एक असल्याप्रमाणे वागणारा - थोडक्यात म्हणजे

सगळ्याच do-gooders प्रमाणे a bit of a bore. पण मास्तर

म्हणत होते,""अरे, तो इतक्या स्वच्छ मनाचा होता की तो दुर्योधनाला

देखील सुयोधन म्हणत असे."" त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले व ते म्हटले,

""तुला काय वाटतं ?""त्यांनी तो प्रश्न मलाच का केला हे एक कोडेच होते. मी काही समोरच्या

बाकावर नव्हतो. मी चौथ्या रांगेत अत्यंत निरूपद्रवीपणाने `कालिकांमूर्ती '

वाचत होतो. त्यामुळे तो प्रश्न माझ्यावर येताच माझी धांदल उडाली. मी

म्हटले, ""सर, कोणते आईबाप `वाईट' अशा अर्थाने सुरू होणारी नावे

आपल्या मुलांना देतील ? मुलीचे नाव दुःशीला ठेवतील ? भुते-पिशाच्चेपान नं. 18

यांपासून संरक्षण व्हावे, व मुले दीर्घायुषी व्हावीत या हेतूने दगडू, धोंडू

मसणू, उकीरडा अशी नावे काही वेळा दिसतात, पण सगळ्याच शंभर

एक मुलांची नावे तशी असतील का ? तेव्हा `दुर' या अक्षरांना `वाईट'

असा अर्थ नंतर केव्हा तरी आला असला पाहिजे. शिवाय ही अक्षरे म्हणजे

काही नंतर लावलेला उपसर्ग नव्हे. ती अक्षरे काढल्यानंतर

उरलेल्या शब्दांना नेहमीच अर्थ उरतो असे नाही. तेव्हा कुठल्या तरी

कीर्तनकाराने सूपभर तांदळासाठी ही वावडी उडवलेली असावी. तरी बरं

धर्मराज आज हयात नाही. नाही तर त्याने `बॅडमिंटन' ला `गुडमिंटन'

म्हटले असते.""पण या धर्मराजामुळे मी गोत्यात आलो. दामले मास्तरांनी मला वर्गाबाहेर

तर घातलेच, शिवाय प्रगतिपुस्तकावर `उध्दट' असा शेरा लिहिला. त्यामुळे

मला घरी देखील सक्तमजुरी मिळाली. पण या साऱ्या अवधीत आनंदाच्या

काही गोष्टी घडल्या. नाही असे नाही. उत्तम व मराठी हस्ताक्षरासाठी मला

दोनदा बक्षिसे मिळाली. आमच्या शाळेचे अद्याप देशीकरण झाले नव्हते.

आमचे प्रिन्सिपॉल अमेरिकेतून येत. एकदा डॉक्टर हिल नावाचे प्रिन्सिपॉल

होते. निळा सूट घालून ते सावकाश शाळेभोवती फिरू लागले की `ऐरावत'

सरकत असल्याप्रमाणे दिसत. अशा फेऱ्या घालत असता त्यांच्या कोटाच्या

बाहीत वेताची छडी असे. ती काही केवळ शोभेसाठी नसून तिची सणसणीत

ओळख अनेकांना झाली होती. त्या दिवसांत प्रत्येक वर्गात मोठी चित्रे

लावली जात. एकदा हिल आमच्या वर्गात आले व त्यांनी विचारले,""हे

प्राचीन अँम्फी थिएटर कुठे आहे ?"" खरे म्हणजे त्या चित्रावरच `रोम' असे

लिहिले होते. पण ते सांगितल्यानंतर त्यांनी विचारले,""रोम कुठे आहे ?""त्यावर मी भीत भीतच, उत्तर दिले,""इटलीत"". भीतभीतच कारण त्या वेळी

इटली व ईजिप्त यांबाबत माझ्या मनात बराच गोंधळ होता. ""you are

right"" म्हणत त्यांनी माझे नाव लिहून घेतले. थोडया वेळाने शिवाप्पा एक

नोटिस घेऊन आला. साहेबाने मला ताबडतोब बोलावले होते. ते ऐकूनच

माझे अवसान संपले. कारण साहेबाकडे गेलेला कोणताच मुलगा सरळ

चेहऱ्याने परत येत नसे. ड्रिलमास्तर नातू यांनी तर कुत्सितपणे सांगितले,

""हाताला खोबरेल नाही तर साबण लावून जा. म्हणजे छडया मऊ

वाटतात.""पान नं. 19

पण तसे काही घडले नाही. मी ऑफिसमध्ये जाऊन उभा राहिल्यावर साहेबाने

एक टाक काढला, व तो म्हणाला ""this is for you."" मी `थँक्यू' म्हणून

बाहेर पडलो, तो वर्गाबाहेर येऊन थांबलो. टाक म्हणजे काचेच्या नळीत

पोपटाच्या कोवळ्या पिसांच्या रंगाचे पाणी होते व त्यात मोहरीएवढा लहान

मासा होता. टाक वर-खाली केला की हो काचेचा मासा जिवंत

असल्याप्रमाणे वर-खाली होत असे. खरे म्हणजे टाक म्हणून त्याचा काहीच

उपयोग नव्हता. शाईत बुडवून त्याने लिहायला बसले की शाई ओघळून

मनगटावर येत असे. पण हिरव्या पाण्याचा रंग मात्र अतिशय आकर्षक

वाटे. रोम इटलीमध्ये आहे, हे माहित असणे म्हणजे काही ज्ञानाची

परमावधी नव्हे. पण तो टाक मी आज देखील जपून ठेवला आहे.तेव्हापासून मात्र सारे स्वच्छ मोकळे वाटू लागले. दातार मास्तर प्रथमच

आमच्या वर्गावर आले. आणि आम्ही अगदी मॅट्रिक होऊन बाहेर पडेपर्यंत

आम्हांला टिकले. त्यांनी आम्हांला इंग्रजी शिकवले, गणित शिकवले व

विशेष म्हणजे ते मराठीचे तास घेत. दुसरे अविस्मरणीय शिक्षक म्हणजे

सायमन. साधारणपणे कोट, ऐसपेसपणे उडत असलेले धोतर, किंवा स्वच्छ

आभाळापेक्षा भूमातेलाच जास्त जवळ असणारे काचा मारलेले धोतर व

आखूड कोट एवढे कपडे पुरेसे मानणाऱ्या त्या शाळेत सायमन मात्र अत्यंत

नीटनीटकेपणाने सुटात येत. त्यांचे अनेक रंगांचे टाय होते. टायवर

झगझगीत पिन असे. कोटाच्या वरच्या खिशात हातरूमालाची टोकदार

त्रिकोणी घडी असे. ते जवळून गेले की सौम्य आकर्षक सेंटचे हलके पीस

जवळून गेल्याप्रमाणे वाटे. पण माणूस मात्र कुर्रेबाज. त्याला कुठल्या

अलबत्या-गलबत्याची सलगी खपायची नाही, की काही वावगे खपायचे

नाही. मागच्या बाकांवर बसणारी निबर नापाशी पोरे तर त्यांच्या दृष्टीने

रजिस्टरमधील नुसती नावेच होती. कुणी इंग्रजी निबंध पेन्सिलीने अगर

लाल शाईने लिहिला तर वही गेलीच खिडकीबाहेर. वासू केळकरने

निबंधाच्या एका वहीत वर श्री काढून त्याखाली कुठल्या तरी मोठया

पोटांच्या स्वामीचे चित्र लावले, तर खिडकीतून बाहेर फेकलेली वही

शोधायला त्याला पाच मिनिटे लागली.त्या वेळी आम्हांला रॉपिड रिडिंग नावाचा एक खुळचट विषय होता. त्यात

आम्हांला दोनशे ओळी इंग्रजी कविता वाचाव्या लागत. रँपिड म्हणजे काय

याचा अर्थ मला अजूनही ठाऊक झालेला नाही. सायमन मास्तरांनी ग्रेचीपान नं. 20

`एलिजी' शिकवायला वीस तास घेतले. त्या वेळी अनुभवलेला थरार

अजूनही कधी तरी जागा होऊन आठवण उजळून जातो.त्यानंतर टेनिसची Tears, Idle Tears व अर्नोल्डची Forsaken

Merman या कविता घेतल्या. ठरल्या ओळी होऊन गेल्या तरी सायमन

मास्तरांचे रॅपिंड चालूच राहिले. अ तुकडीच्या राव मास्तरांनी सगळाच

मामला सात तासांत खलास केला. नंतर ते डिक्टेशन घालून खुर्चीत स्वस्थ

बसत. काही माणसांना कधी काव्याचा स्पर्श होत नाही, कधीच काहीची

काव्याची धुंदी उतरत नाही, हेच खरे. नंतर सायमन इंदूरला गेले. तेथे

त्यांची बायको डॉक्टर होती, आणि सायमनना तेथील विभागाच्या

मिशनमध्ये काम करावे लागणार होते. जाताना त्यांनी काहीवस्तू

आमच्यापेकी काही जणांना वाटल्या. प्रभाकरला एक नक्षीदार दौत

मिळाली. मला त्यांनी एक अँटलास, चार जुनी व अत्यंत सुदंर ख्रिसमस

कार्डे आणि दोनच थेंब अत्तर उरलेली बाटली दिली. अत्तर संपून गेले.

कार्डे देखील कुठे नाहीशी झाली. पण त्यांनी शिकविलेल्या कविता मात्र

देव्हाऱ्यामधील चांदीच्या टाकाप्रमाणे मनात अगदी स्वच्छ आहेत. नंतर

अनेक वर्षांनी स्वतः कविता शिकविण्याचे दिवस आले तेव्हा सतत वाटायचे.

सायमन मास्तरांच्या शिकविण्यातील एक दशांश तरी माझ्यात यावा. पण

तसे कधी घडल्याचे समाधान मला आठवत नाहीत.सायमन मास्तरांचा तास संपला की शाळेतील दिवसाची सुगंधी घडी जात

असे. त्यानंतर काचा मारलेले व बटाटयांच्या सालीच्या रंगाच्या धोतरातले

दातार मास्तर येत. मग आम्हांला एकदम ऊबदार, घरगुती व काही वेळा

तर वाह्यात वाटू लागे. शाळेत एकदा पुस्तके टाकली की संध्याकाळपर्यंत

तिकडे ढुंकून न पाहमारा थोडे देखील त्या तासाला हजर राहत असे. तो

काही अभ्यासाकरिता येत नसे. पण त्या वेळी वर्गात जी गंमत चाले ती

त्याला आवडे.दातार मास्तरांनी अगदी मॅट्रिकपर्यंत आम्हांला हा ना तो विषय शिकवला.

पण शिकवणे म्हणजे कोंडट, कंटाळवाणे वातावरणे मात्र कधी नसं.

कुठल्या तरी मोठया माणसाचे श्राध्द चालले आहे असा भास नसे.विषय कुठलाही असो, प्रथम ते खडूच्या तुकडयांनी भरलेली जुनी

कापूरपेटी काढत. मग फू फू करून टेबल त्यातल्या त्यात स्वच्छ करूनपान नं. 21

घेत, व तपकिरीची डबी काढून चिमूटभर तपकीर नाकपुडयांत भरत.

सायमन मास्तर जवळून गेले की सेंटची बाटली उघडल्याप्रमाणे वाटे, तर

दातार मास्तर येऊ लागले की जवळपास कुठे तरी तपकिरीचे दुकान

असावे असे वाटू लागे. सेंटमुळे एकदम चपापल्याप्रमाणे वाटे, तर

तपकिरीच्या वासाने अवघडलेले मन सेलावत असे.त्याचीच खूण आजपर्यंत टिकली आहे. काही पूर्वग्रह जबरदस्त असतात व

जळूप्रमाणे ते आयुष्यात कायम चिकटून राहतात. आपली नात घरातील

पुस्तके कशी टराटरा फाडून बाहेर फेकते, किंवा आरसे-कपबशा फोडून

खिडकीतून बाहेर फेकते, हे कौतुकाने व बऱ्याच विस्तराने सांगत

बसणाऱ्या एखाद्या आजोबाला क्षमा करणे काही वेळा मला कठीण वाटत

नाही. पण तंबाखू चघळत ओठांची कुंची करून बडबडणाऱ्या माणसाची

मात्र ताबडतोब बाहेर रवानगी होईल. आपल्या गेल्या ऑपरेशनविषयी

स्टूल रिपोर्टपासूनसारे काही सांगणारी बाई, कडा कातरल्याप्रमाणे काढून

चपातीचा मधलाच भाग खाणारी माणसे, येताना इतर दोन-तीन जणांना

आगंतुकपणे बरोबर आणणारे पाहुणे, जीन्स घालणाऱ्या मध्यमवयीन

स्त्रियां, यांना माझ्याकडे औपचारिक देखील स्वागत नाही. पण कुणी

तपकीर ओढत असेल तर त्याच्याशी अर्धा तास मनमोकळ्या गप्पा मारणे

मला बरे वाटते. मला स्वतःला तपकीर आवडत नाही, पण तपकीर ओढणारे

दातार मास्तर आवडत, व त्यांच्यामुळे त्यांच्या वर्गातील लोकांविषयी मला

जवळीक वाटते.दातार मास्तरांच्या तासांपेकी एक तास सातवा असे. त्या वेळी पोरे कंटाळून

गेलेली असत. व मास्तर देखील चुरगळलेले दिसत. अशा वेळी क्रिकेट

आणि गडकरी ही मास्तरांची देवते आमच्या मदतीला येत. पण त्यासाठी

गनिमी कावा लढवावा लागे, व त्याची योजना सकाळपासूनच ठरवावी

लागे. खरे म्हणजे मास्तर स्वतः काचा मारलेल्या धोतरात, उघडया

पावलांनी जिमखान्याच्या कोर्टावर टेनिस खेळत आणि बऱ्यापेकी खेळत.

हातभर उंच असलेल्या नाइक मास्तरांनी एकदा सर्व्हिससाठी चेंडू वर

उडवला, पण तो रॅकेट चुकवून त्यांच्या नाकावर पडला व त्यांचा चष्मा

मोडला. तेव्हापासून मास्तर माणसे टेनिस खेळत आहेत हे समजताच

आम्ही आमचा खेळ तसाच टाकून कोर्टाच्या कडेला जाऊन बसत असू.

आम्हांला टेनिसमधले फारसे काही कळत नव्हते, पण नाइक मास्तरांच्यापान नं. 22

सारखी गंमत पुन्हा घडली तर त्या वेळी आम्हांला गेरहजर राहायचे नव्हते.कधी कधी तर दातार मास्तर क्रिकेट देखील खेळत. त्या सगळ्यांची कसली

तरी संडे टीम देखील होती. मोठयांत जॅगरी किंग आणि पोरांत गुळाचा

गणपती म्हणून प्रसिध्द असलेले पाटील हे मूळचे गुळाचे व्यपारी

हॉटेलवाले रेगे त्या टीममध्ये होते. शिवाय डाव्या हाताने बोलिंग करणारे

थत्ते वकील, आणि अडीअडचणीला कोणत्याही विषयावर धार्मिक अथवा

राष्ट्रीय कीर्तन करणारे ग्रामोपाध्ये हे देखील होते. असली टीम जगात कधी

झाली असेल की नाही कुणास ठाऊक. एकीकडे जर एखादा गडी कमी

पडला तर दुसऱ्या बाजूचा एक जण इकडे येत असे, किंवा इकडचा एक

खेळाडू दोनदा खेळत असे. दातार मास्तर जरी अधूनमधून क्रिकेट खेळत

असले तरी देवण्णावर मास्तरांप्रमाणे त्यांना क्रिकेट इतिहास काही घडवता

आला नाही.देवण्णावर मास्तर चालताना डोलत असत व त्या वेळी वारा भरलेले धोतर

जहाजाच्या शिडाप्रमाणे वाटे. खेळताना पायाला एकच पॅड पुरे होत असे.

एक तर साऱ्या टीममध्येच एकंदरीने दोन पॅड होते, व त्यांतील एक दुसरा

खेळाडू वापरत असे. शिवाय खाली वाकून पट्टे बांधणे हे त्यांना एका पॅडच्या

बाबतीत देखील फार जिकिरीचे वाटे. एका रविवारी त्यांनी दातओठ खात

एक चेंडू हाणला, आणि धाव घेण्यासाठी दौंड सुरू केली. विकेटकीपर

खानोलकर मागे वळून चेंडू शोधू लागला. केवळ सवय म्हणूनच जोशी

बाउंडरीकडे धावू लागला. पण चेंडू कुठेच दिसेना. देवण्णावर मास्तर तर

सारखे धावत होते. तीन-चार-पाच धावा झाल्या तरी ते थांबेनात, व चेंडू

देखील सापडेना. मग थत्ते वकिलांच्या ध्यानात सारा प्रकार आला. त्यांनी

देवण्णावरना पकडले, तेव्हा टीममध्ये असलेला काबाडे नुकतीच पेटवलेली

सिगारेट बाजूला टाकून त्यांच्या मदतीला आला, व क्रिकेट पिचचा आखाडा

झाला. थत्ते वकिलांनी देवण्णायवर मास्तरांच्या सोग्यात अडकलेला चेंडू

काढला, व तो स्टंपांवर हाणून ""औट"" म्हणून गर्जना केली.""पण बॅट््समनला अशी टांग मारून औट करता येतं का ?"" बॅट उगारत

देवण्णावर थत्तेंकडे धावत आवेशाने म्हणाले.""मग सोग्यात चेंडू घेऊन धावा काढत बसायच्या की काय त्याने कलियुग

संपेपर्यंत?""पान नं. 23

""मग त्याबद्दल एम.सी.सी.चे नियम दाखवा."" कायदेशीर मोर्चा बांधत

देवण्णावर म्हणाले.""तरी बरे, ऑस्ट्रेलियातून ब्रॅडमनला घेऊन या म्हणाला नाहीत !"" थत्ते

कुत्सितपणे म्हणाले.""लोक हो, धोतराचा सोगा म्हणजे काय हे देखील साहेबाला माहीत असणार

नाही. मग सोग्यात चेंडू अडकला म्हणजे काय करायचे, याचे नियम काय

करणार तो आमचं टाळकं !"" समझोता घडविण्यासाठी दातार मास्तर

म्हणाले व आम्ही पोरांनी टाळ्या वाजवल्या.अखेर तडजोड झाली. देवण्णावर औट झाले. पण नऊ धावा दिल्याखेरीज

हा निर्णय स्वीकारायचे त्यांनी साफ नाकारले. आम्हांला नाइक मास्तरांच्या

नाकावर पडलेला चेंडू पाहायला मिळाला नाही हे खरे; पण एका बॉलमध्ये

नऊ धावा मिळवणारा खेळाडू इतरांना कुठे पाहायला मिळाला ? आज

हेलमेट, पॅड रिस्टबँड असा श्रृंगार करून क्रिकेट खेळतात. शेळी लेंडया

टाकत राहते. त्याप्रमाणे व त्याच गतीने चार-पाच हजार धावा देखील

काढतात. पण एका बॉलमध्ये नऊ धावा घेणारा देवण्णावर मास्तरांसारखा

खेळाडू मात्र आता भूतली होणे नाही. There were giants in those

days ! आणि धावांचा मुद्दा अतिशय महत्वाचा होता. मॅच संपल्यावर सगळे

जण संध्याकाळी भीमाक्काच्या खानावळीत पालापाचोळा जेवण करत, व

मार खाल्लेल्या टीमने तो खर्च करायचा असे. वास्तविक भीमाक्काची

खानावळ असेच नाव वापरत. भीमाक्कानंतर तिचा मुलगा व त्याची बायको

यांनी खानावळ चालवली ती `क्षुधाशांति भवन 'या जबरदस्त नावाने नंतर

आपला व्यवसाय कोणताही असला तरी नावात `भारती' हाशब्द

वापरण्याची लाट आली, आणि रिकामटेकडे लोक खानावळीला

भूक-भारती असे म्हणू लागले. पण मुलगा व सून एव्हाना अंगाने अतिप्रशस्त

वाढून बसली होती, आणि खानावळीचे नाव आपोआपोच बदलले, आणि

होऊन बसले - लठ्ठ भारती !क्रिकेट खेळताना दातार मास्तर ग्राउंडवर स्टंपांना नमस्कार

सांगून येत इतकेच. त्यांनी तेथून कधी भेपळा जरी आणला नाही तरीपान नं. 24

वखार फुटल्याप्रमाणे धावा गोळा करत, सत्तर ऐशींचे बोजे देखील आणलं

नाहीत. माणसाला किती जागेची गरज आहे या प्रश्नाप्रमाणेच माणसाला

किती धावांची गरज आहे या प्रश्नाला त्यांचे उत्तर निश्चित असावे. नंतर

नंतर तर दातार खेळायला आले की खेळ जवळ जवळ संपलाच, असे

समजून वडाखाली हातरूमाल अंथरून थंड वारे घेत बसलेली पोरे उठू

लागत, व आपला घसा ओला करण्यासाठी शाळेच्या विहिरीकडे चालू

लागत. आमचा घसा तापण्याचे कारण कडक ऊन हे नव्हते. कारण

ग्राउंडच्या कडेने पुष्कळ झाडे होती, व त्यांतील एका कोपऱ्यात असलेल्या

अतिशय प्रशस्त अशा वडाखालीच आमचा मुक्काम असे. आमची कोणत्या

एका टीमशी अशी निष्ठा नव्हती. पण कुणीही खोळाडू औट झाला तरी

`पार्शिआलिटी अंपायर' म्हणून आमचे ओरडणे चालू असे, व त्यामुळे घसा

कोरडा होत असे. तीनही दांडया जरी तीन निरनिराळ्या दिशांना उडाल्या

तरी `पार्शिआलिटी अंपायर' हे आमचे मत मात्र कधीही बदलत नसे. इतकेच

नव्हे तर ग्राउंडवर कुणी तरी अंपायर असतो म्हणूनच खेळाडू औट होत

असतात, हे देखील आम्ही मान्य केले असते.त्यानंतर मास्तरांची दृष्टी बिघडली, व चेंडू कोठून येतो हे देखील त्यांना

दिसेना. अनेकदा तर बोलरच्या हातून चेंडू निसटण्याच्या आधीच त्यांची

बॅट फिरवून झालेली असे, व ते मोठया आशेने बाउंडरी धुंडाळत असत.

मग त्यांनी क्रिकेट सोडूनच दिले, पण ते मुळमुळत नव्हे. तर अगदी

ठणकावून. Not with a whimper, in a burst of glory ! एकदा ते

बॅट फिरवत असता, कसा कुणास ठाऊक, चेंडू कडमडत तिच्या वाटेत

आला व उंच उडाला. चर्चकडील बाउंडरी वीस-पंचवीस फूट तरी कमी

होती. चेंडू वर उडाला व सरळ बाउंडरीपलीकडे जाऊन पडला. मास्तरांचा

त्यावर विश्वासच बसेना. त्यांनी बॅट काखेत मारली व ते बसायला

टाकलेल्या बाकाकडे चालू लागले. ""पार्शिआलिटी अंपायर"" असे आम्ही

ओरडलो नाही, असा तो एकच प्रसंग. सगळ्यांनी मास्तरांभोवती गर्दी केली

व थोडया थट्टेनेच त्यांचे अभिनंदन केले. मास्तर म्हणाले, ""आजपासून

क्रिकेट बंद. आयुष्यात मी ही एकच सिक्सर मारली. रिटायर व्हायला

यापेक्षा चांगला दिवस कधी येईल का ?"" त्या दिवसापासून खरोखरच

त्यांनी हातात बॅट धरली नाही. ते ग्राउंडवर येत. ते काही वेळा अंपायर होत,

व आमची कुचंबणा करत. कधी ते स्कोअरर होत. ते रविवारी हटकूनपान नं. 25

ग्राउंडवर दिसत, पण त्यांचा क्रिकेट रोमान्स संपला होता.शेवटच्या तासाला जर आमच्या गनिमी काव्यात मास्तर सापडले, तर

आम्ही बेहद्द खूष होत असू. पण आज मात्र वाटते, मास्तर आम्हांलाच

बनवत असावेत. ते काही इतके भोळे नव्हते. त्यांना देखील कंटाळा आलेला

असे, व ते आपखुषीने आमच्या नाटकात सामील होत. आमच्यापेकी कुणी

काय विचारायचे, म्हणायचे हे आधी आधीच ठरवलेले असे. पण ऐन वेळी

जर आपला बेत साधला नाही,तर आणखी काही तरी पदरी असावे म्हणून

एक उपकथानक आम्ही तयार ठेवत असू, साधारणपणे नानू बापट मागच्या

रांगेत कोपऱ्यात बसत असे. या शेवटच्या तासाला आम्ही त्याला डिवचून

खेचून पुढील रांगेत मध्यभागी अगदी टेबलाजवळ बसवत असू. त्याने जर फारच

चिकाटी दाखवली तर निर्मळकर त्याला उचलून त्या जागेवर

बसवत असे. अभ्यासाविषयी निर्मळकराइतके शुध्द वेराग्य असलेला

मुलगा साऱ्या शाळेत मिळाला नसता. दर शनिवारी मुरांच्या बाजाराजवळ

जे लहान मेदान भरे. तेथे तो हटकून एखादी कुस्ती जिंकून रंगवलेल्या

मलमलीचा तुकडा, किंवा तीन नारळ असे बक्षीस मिळवत असे. अलजेब्रा,

जॉमोट्री,अक्षांश-रेखांश, भावे प्रयोग हे शब्द देखील त्याचे नाव ऐकताच

पटापट निपचित पडत असावेत !नानू बापट मेणबत्तीतील वातीप्रमाणे असून त्याचे डोळे नेहमी ओलसर

असत. मास्तरांनी तपकीर सांडलेला सदरा झटकला की रिंगण सुरू होई.

दोनचार पोरे खोकल्याने बेजार होत व खिडकीपाशी जाऊन उभी राहत.

बापट मात्र काही केल्या रणछोड होत नसे, पण त्याचप्रमाणे त्याला

शिंका-खोकला दाबून ठेवता येत नसे. त्या प्रयत्नात त्याच्यातून जे

निरनिराळे बारीक आवाज बाहेर पडत ते ऐकून शेजारच्यांच्या अंगावर

कोसळल्याखेरीज आम्हांला हसू आवरत नसे. स्कॉटिश बँडमध्ये पिशवी

दाबत बॅगपाइप आवाज निघतात, त्याप्रमाणे नानू बापट हा कशाने तरी

दाबला जात आहे असे आम्हांला वाटे. पण काही झाले तरी हा उपाय

किरकोळ होता. तो फार तर दहापंधरा मिनिटे टिकत असे. नंतर तर हा

मार्ग देखील बंद झाला. नानूला स्वतःचे इतके डोके असेल असे आम्हांला

मधीच वाटले नव्हते. मास्तरांचा शेवटचा तास असला की तो आधीचा तास

चुकवून त्या तासाला दोनचार मिनिटे उशीरा येऊ लागला. त्याने ""May

I come in, Sir ?"" असे विचारले की मास्तर त्याच्याकडे डोळे वटारूनपान नं. 26

पाहत व म्हणत,""या या, नाना फडणीस. बापट, आज आपला चंद्रोदय

उशीरा झालेला दिसतो. या आणि त्या कोपऱ्यातील बाकावर आसनस्थ

व्हा. "" पोरे हसत. वर्गात कोपऱ्यात एक जादा बाक होते. तेथे नानू खाली

मान घालून बसे. व डोळे पुसत मधून मधून आमच्याकडे पाहत आवाज

करत हसे. मग आधी ठरल्याप्रमाणे तिसऱ्या रांगेत कुणी तरी कुणाला तरी

ढकलत मोठयाने ओरडू लागे. त्यावर दातार मास्तर करडया आवाजात

विचारत,""काय रे भोपळ्यांनो, काय गडबड आहे.?""मग गोपाळ चोपडे उभा राहून साळसूदपणे म्हणे, ""सर, हा प्रभाकर म्हणतो,

नायडूने एका मॅचमध्ये सोळा सिक्सर्स मारले हे सारे झूट आहे. त्याचा

त्यावर विश्वास बसत नाही. ब्रम्हदेवाला देखील इतके सिक्सर्स कधी मारता

येणार नाहीत.""मग जरी त्यांनी नुकतीच तपकीर भरलेली असली तरी मास्तर पुन्हा डबी

काढत व रागाने पुन्हा एक चिमूट नाकात भरत. अशा वेळी हात थरथरून

बरीच तपकीर सदऱ्यावर पडे. मग ते कोटाची बटणे काढत, प्लॅपॉर्मवरून

खाली उतरत व थेट प्रभाकरसमोर जाऊन उभे राहत. सीतेच्या

चारित्र्याविषयी संशय घेणारा परीटच समोर बसला असल्याप्रमाणे ते

त्याच्याकडे शंभर वॅट डोळ्यांनी पाहत. त्या अवस्थेत ते मिनिटभर थांबत,

व मग स्फोट होई,""म्हणे विश्वास बसत नाही !"" ते उसळून म्हणत, ""तुझा

विश्वास बसणे न बसणे ही गोष्ट इतकी महत्वाची आहे काय रे

भोपळ्या ?""मास्तरांचा सर्वांत कडक शब्द म्हणजे ""भोपळ्या !"" आणि ते तो शब्द

डबल भोपळा निर्मळकरापासून शून्य भोपळा नानू बापटापर्यंत सर्रास

वापरत."" अरे, तुला क्रिकेट म्हणजे काय हे तरी माहीत आहे ? म्हणे विश्वास

बसत नाही ! आणि नायडूंची सिक्सर म्हणजे काही बाउंडरीपलीकडे फेकलेला

कचऱ्याचा गोळा नव्हता. आम्हांला वाटायचे की बॉल खाली उतरला की

त्याचा स्फोट होणार, आणि मुंबईचा समुद्र हातभर तरी मागे सरकणार !

टाक जा तुझा तो विश्वास भिकाऱ्याच्या झोळीत ! तुला अमरसिंगाचे नाव

तरी माहित आहे का ? अमरसिंग माणूस नव्हता. ती एक महाकाली तोफ

होती तोफ, माहीत आहे ? क्रिकेटच्या दुष्काळात जन्मलेली पाप्याची पितरे

तुम्ही, एकेक काडी गोळा करून रवंथ करणारे प्राणी तुम्ही-तुमचा काय

कपाळ विश्वास बसणार.

---------------------------------------------------------------

पान नं. 38आता टेबलावरील पुस्तक तर त्यांच्या दृष्टीने मेलेच होते. पण घंटेला तर

अजून अवकाश होता. तातूला आणखी काही तरी म्हणायचे होते, पण

त्याला बोलू न देता मास्तरच म्हणाले,""आणखी एक सांगतो. त्याच्या

नाटकांत खरी पात्रे आहेत ती त्यांची भाषणेच. एका भाषणाला दुसरे सामोरे

जाते, संघर्ष घडतो, व काही वेळा तर लखलखाट होऊन डोळे दिपतात.

सुधाकर,वृंदावन, भूपाल, धुंडिराज ही नावे आपली आहेत सोयीसाठी

नायट्रिक अँसिड,तेजाब ही नावेही आहेत सोयीसाठीच. पण तेजाब म्हणजे

काय, हे त्याला हात लावून बघ म्हणजे समजेल. अरे, अंग पुसायला

राजापुरी पंचे आहेतच की दरिद्रयांनो; पण वरातीत पाहिजे ती पेठणच !

तरी सुध्दा घंटेला अवकाश होता. तातूने हात वर केला व म्हटले, ""सर,

मला बऱ्याच दिवसांपासून एक विचारायचे होते. ""त्यावर आम्हांला एकदम उत्साह वाटला. अशारीतीने तातूने सुरूवात केली

की तो काही तरी भलतेच वेगळे बोलणार हे आम्हांला माहीत होते. तो

म्हणाला, ""सर. पासोडी म्हणजे काय ?""मास्तर दचकून त्याच्याकडे पाहतच राहिले. ते म्हणाले,"" पासोडी म्हणजे

चादरीप्रमाणे जाड सुताडी पांघरूण. आता पासोडी का आठवली.?""""सर, असल्या पासोडीवर कसल्या टाकाने, बोरूने लिहिता येते ? मी एकदा

तसे लिहून पाहण्याचा प्रयत्न केला, तर दोऱ्यात अडकून बोरू दोनदा

मोडला. मी दासोपंताच्या पासोडीविषयी कुठे तरी वाचले की त्यावर त्यांनी

आपल्या कविता लिहिल्या. मला वाटते, पासोडी या शब्दाचा अर्थ वेगळा

आहे.""""असे तुम्हांला वाटते का ?"" कमरेवर हात ठेवून मास्तर म्हणाले, ""मग

पंडितराज, आपला अर्थ सांगून आम्हा सर्व पामरांना का धन्य करत

नाही ?""तो शब्द पासोडी नसून पासोदी असा असावा. पासोदी म्हणजे पासोदाची

कविता. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांची भारूडे, भागवत त्याप्रमाणे.""पान नं. 39

""पण ज्ञानभास्कर, पासोदा म्हणजे तरी काय ?""""पासोदा हे कवीचे नाव, पण ते त्याने उलट लिहिले आहे. खरे नाव दासोपा,

दासप्पा किंवा दासोपा असे नाव असते, सर""एकदम दडपण कमी झाल्याप्रमाणे मास्तर मोठ्याने हसू लागले. आमच्या

घरी पूर्वी ते, आजोबा करंदीकर, अप्पा काळे बोलत असता त्यांचे असले

मनमोकळे हसणे आम्हांला आत ऐकू येत असे. त्यांच्यातील ताण,राग सारे

आता ओसरून गेले होते. आम्हांला अगदी जवळचे वाटणारे मास्तर दिसू

लागले. ते म्हणाले, ""तातू, तुझ्या डोक्याला झाकण असते तर बरे झाले

असते बघ. म्हणजे कधी तरी ते काढून आत काय काय चालले आहे हे

पाहता आले असते. कमाल गंमत झाली असती."" तोच घंटा झाली. आम्ही

उठलो, पण जात असता मास्तरांच्या चेहऱ्यावर अजूनही हसणे होते.मला एकदा तरी वर्गातून हाकलून घातल्याखेरीज कोणतेच वर्ष जाऊ नये

असे लिखितच होते की काय कुणास ठाऊक आणि या खेपेला एका दृष्टीने

कांदेविक्या जबाबदार होता, याचा मला विशेष राग आला. हा कांदेविक्या

अ तुकडीत होता. पण दहा मिनिटांच्या सुट्टीत तो कधी तरी आमच्याकडे

येई व नंतरचा तास आमच्यातच बसे. आडनावाच्या बाबतीत पोरांच्या

जिभा अगदी नाइलाज झाला तरच सरळ राहत. कांदेविक्या हे काही त्याचे

खरे नाव नव्हते. ते होते कानविंदे. आणखी एक नाकाडी म्हणून विद्यार्थी

होता. तो तर पहिल्याच दिवशी `नाकात काडी नाकाडी' होऊन बसला.

दड्डीकराचे धड्ड होणे, गोखल्यांचे खोकल्या, बोरकराचे बोऱ्या हे सारे

रीतसरच होते. प्रभाकरला देखील त्याचा `प्र' अगदी परवापरवाच परत

मिळाला होता. तोपर्यंत त्याला भाकरवरच समाधान मानावे लागत होते.

या मुद्रदानातून सुटायची ती तीनच नावे. कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी.

या तीन नावांची पेदासच अशी भयानक होती, की निव्वळ संख्येच्या

आधारावरच टिकून राहणे फारसे अवघड नव्हते. पण त्यात जर

आद्याक्षरेच धोकेबाज असतील तर कपाळाला हात लावायचा, व गप्प

बसायचे. एक पी.जी.जोशी पाजी जोशी झाला; एक डी आर. कुलकर्णी

ढोर कुलकर्णी झालाच; आणि डी.एम.व टी. आर जोशी ढम्म जोशी आणि

टर्र जोशी झाले. !कानविंदे इकडे यायचा म्हणजे तो काही आम्हांला प्रेमाने भेटायला यायचापान नं. 40

नाही. त्याचा एक वीतभर लेख कुठल्या तरी मुलांच्या मासिकात प्रसिध्द

झाला होता. तेव्हापासून तो कपाळावर दोन विचारी सुरकुत्या टाकून

इकडे-तिकडे भटकत विश्वाची चिंता करत असे. तो आमच्याकडे आला की

आम्ही ओळखत असू की, त्याने नवीन काही तरी लिहिले आहे. आम्ही

मुद्दामच वेगळे विषय काढून त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला उतावीळ

करत होतो. त्याला पाहताच तातूने अफगाणिस्तानातील नद्यांची माहिती

द्यायला सुरूवात केली, तर प्रभाकरने चीनमध्ये माणसे झुरळांचे किती

प्रकार खातात याचे अत्यंत सविस्तर आणि काल्पनिक वर्णन द्यायला

सुरूवात केली. अखेर न राहवून कानविंदेच म्हणाला, ""काल मी एक कविता

केली आहे. तिचे नाव आहे `हा चांदोबा आहे सुदंर."" हे नाव ऐकताच तातू

अंगाला गाठ मारून मागे कोपऱ्यातसरकला. प्रभाकरने आपल्या

कपाळावर तर हात मारून घेतलाच, पण आम्हा दोघा-तिघांच्या कपाळावर

देखील हात मारला.आभाळाचे निळे पाणी पोहायला

कोवळ्या तारका त्या खायाला

ढगांचा सावरी कापूस झोपायला

पण अमावास्येला असतोस कुठे रे ?

हसतो बिलंदर ! हा चांदोबा आहे सुंदर.आणि त्याबरोबर हसण्याचा स्फोट झाला. प्रभाकर तर एक पाय वर करून

`हसतो बिलंदर, हसतो बिलंदर' म्हणत नाचू लागला. तोपर्यंत सुट्टी

संपल्याची घंटा झाली, आणि कणकेच्या गोळ्याप्रमाणे चेहरा झालेला

कानविंदे बाहेर पडायच्या आत दातार मास्तर वर्गात आले. तेव्हा तो खाली

मान घालून आमच्याच वर्गात बसला.""सर, या कानविंदेने एक अप्रतिम कविता लिहिली आहे."" प्रभाकर म्हणाला.

""त्यात एक बिलंदर चंद्र आहे. तो सुंदर आहे म्हणून बिलंदर आहे की बिलंदर

आहे म्हणून सुंदर आहे, हे मात्र आम्हांला समजले नाही.""""मला आणखी काही तसल्या ओळी माहीत आहेत,"" तातू म्हणाला, ""का न

खाशी गोमय ताजे ? एखाद्याला शेण खायला सांगताना सुध्दा त्यातल्या

त्यात त्याने ताजे शेण खावे हे सांगण्याइतके सौजन्य आजकाल दिसत नाही.""पान नं. 41

""माती असशी, मातित मिळशी. पण लक्षात ठेवा, हे आत्म्याला लागू नसे.""

प्रभाकर म्हणाला, ""एखाद्या औषधाच्या बाटलीवर लिहितात तसे हे फक्त

बाहेरून लावायचे. पोटात घ्यायचे नाही. आत्म्याला हे लागू नसे."" तातूने

मळकट डायरीसारखी एक वही काढली होती, व तिच्यातून तो मधून मधून

वाचत होता -उठा उठा रे बांधा कंबर

तुमच्यापुरती ही घी-शक्कर

टाकुनि रूढीशी द्या टक्कर !

खुबी ओळखा, क्या हे अंदर !""असे होते कधी कधी."" मास्तर म्हणाले. पण आज एकंदरीने ते व्यग्र दिसत

होते, कारण त्यांनी खोटेच रागावून कुणालाच भोपळ्या म्हटले नाही.""आज येताना मला एक प्रेत दिसले. ते एका मुलाचे होते; पण त्याची आई

मारूतीच्या देवळापुढे उभी राहून त्या मुलाला पूर्ण आयुष्य देऊन सुखी ठेव,

असे हात जोडून म्हणत मध्येच हसत होती. मला एकदम राजहंस कवितेची

आठवण झाली."" ते सांगत होते. वास्तविक आम्ही त्यांचे वेगळे स्वरूप पाहून

गप्प बसायला हवे होते. पण आम्ही आज फसफसून झिंगल्याप्रमाणे झालो

होतो की काय कुणास ठाऊक ! मी म्हटले, ""त्या कवितेत सुद्दा असल्या ओळी आहेतच -ते ह्दय कसे आईचे

मी उगाच सांगत नाही.""एवढ्यावर देखील थांबायला हरकत नव्हती. पण माझ्यात कसले तरी पिसे

चढले होते आणि शेजारच्या कांदेविक्याला पाहून तर तो जास्तच वाढले. मी

सूर काढला -परांजपेच्या हॉटेलातिल पुरी-पातळभाजी-

मी उगाच सांगत नाही !""मग प्रभाकर देखील चेकाळला. तो म्हणाला,""तानिबाईची मिरची भजी

मी उगाच सांगत नाही !""पान नं. 42

मग इतर काही पोरांना देखील त्यातील गंमत समजली, आणि ती ""मी

उगाच सांगत नाही "" ही ओळ एकत्र सामील झाली.बादशाहिमधला खिमा ब्रेड-

मी उगाच सांगत नाही

ब्रम्हचारी सिनेमा बघा तरी-

मी उगाच सांगत नाही

डिलाइटमधले रवा-डोसे

मी उगाच सांगत नाही...हा वाह्यातपणा पंधरा मिनिटे चालला, व आम्ही पोटाचे चक्र होईपर्यंत

खिदळलो. पण मध्येच काही तरी तुटल्यासारखे झाले, व सगळे जण

गप्पगार झाले. मास्तर माझ्यापुढे येऊन उभे राहिले होते, व माझ्याकडे

पाहत होते. त्यांचा चेहरा रक्त साकळल्यासारखा झाला होता, व उजवा हात

किंचित थरथरत होता.मग आम्ही पूर्वी कधी न ऐकलेल्या आवाजात ते मला

म्हणाले,""तुम्ही आपली पुस्तके गोळा करा, आणि वर्गातून चालते व्हा आणि

मला विचारल्याखेरीज माझ्या तासाला येऊ नका.""हा आवाज,`तुम्ही' या शब्दाचा वापर हे सारे मास्तरांचेच, यावर माझा

विश्वास बसेना. पण त्यामुळे मला एकदम मुस्कुटात मारल्याप्रमाणे झाले.

मी खाली मान घालून पुस्तके गोळा केली व बाहेर पडून घरी आलो. घरी

कंरदीकर आजोबा येऊन बसले होते. मला पाहताच ""काय म्हणतो आमचा

किट्टू मास्तर,"" असे विचारणार हे मला माहीत होते. मी तसाच

घरासमोरून पुढे गेलो, व बराच वेळ पिंपळकट्टयावर बसून बऱ्याच उशीरा

घरी परतलो.त्यानंतर दोन दिवसांनी मास्तरांचा तास होता. आधीचा तास बायबलचा

होता. त्या वेळी मला बऱ्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळत. शिवाय चांदेकर

मास्तर गाणे देखील सुरेख म्हणत असत. आज आई आजारी म्हणून तातू

आला नव्हता. मी घाईघाईने पुस्तके गोळा केली, व त्याच्या घरी जावे म्हणून

निघालो, तर दारातच दातार मास्तर उभे.""काय रे. कुठे निघालास ?"" त्यांनी विचारले.""घरी. वर्गात बसू नको असे तुम्ही सांगितलेत.""पान नं. 43

""जा, फार शहाणा झालास. बाकावर जाऊन बस."" आत येत ते म्हणाले व

थोडे हसले""पण नंतर साऱ्या तासभर त्यांनी नजर देखील माझ्याकडे वळवली नाही.

पण त्यांचे बरेचसे बोलणे माझ्यासाठीच होते.ते म्हणाले, ""कित्येकदा फार मोठया कवींच्या केसांत देखील नट्टा-पट्टा

उमटतो. मग निर्जीव ओळी लिहिल्या जातात, आणि त्या वाचताना मन

विरजते. शेक्सपियरच्या नाटकात देखील ओळीच्या ओळी रिकाम्या

गाडग्यारप्रमाणे येतात. पण हिमालयाची थोरवी त्याच्या शिखरावरून

ठरवावी त्यातील खोल दऱ्याभेगांवरून नव्हे. गंगेला देखील पाणउतार

असतो, आणि सरस्वतीला देखील थकून जांभई येते. म्हणून

राजहंससारख्या कवितेतही `मी उगाच सांगत नाही.' असल्या ओळी येतात.माझा ताण तटकन तुटला, व मी रागाने ओठ आवळले. जाताना देखील

मास्तरांनी माझ्याकडे पाहिले नाही. त्यानंतरचा तास चुकवून मी घरी

आलो. तेव्हा करंदीकर आजोबा नुकतेच पगडी टेबलावर ठेवत होते. मला

पाहताच ते म्हणाले, ""काय बच्चमजी, कसा आहे आमचा किट्टू मास्तर ?""मी उसळत्या रागात त्यांना हकीकत सांगितली व म्हटले, ""तुमचे किट्टू

मास्तर भयकंर पार्शिआलिटी अंपायर आहेत. मी तसे म्हटले तर त्यांनी

मला वर्गातून हाकलून दिले. पण आज मात्र त्यांनी स्वतःच त्या ओळीवर

टीका केली. म्हणून मी नंतरचा तास चुकवून घरी आलो.""त्यावर करंदीकर आजोबा इतके हसले की त्यांना खोकला आवरायला पाच

मिनिटे लागली. तोपर्यंत अप्पा काळे देखील आले. त्यांनी पायरीवरूनच

सिगारेट गटारात टाकली, व ते आत आले.""मोठा खोकला उकरून काढायचे तुमचे वय संपले, भीष्माचार्य,"" ते

म्हणाले. खरे म्हणजे आजोबा अप्पा काळ्यांपेक्षा आठदहा वर्षांनी मोठे

असतील. पण ते अप्पांना नेहमी भीष्माचार्य, द्रोणाचार्य असल्या

महाभारतातील नावांनीच हाक मारत. करंदीकरांनी अप्पांना सारी हकीकत

सांगितली. तेवढ्यात आमचे दादा घरी आले, आणि माझे सगळेच बिंग बाहेर

पडले. मग करंदीकर मला म्हणाले,""हे बघ बच्चमजी, तू काही तरी वागह्यात

बोलणे, आणि किट्टूने काही म्हणणे दोन्ही सारखेच होय रे ? त्याच्यासारखे

पान नं. 44

गडकऱ्यांवर प्रेम कर, आणि मग तसे बोल. तू तुकाराम आहेस का? तुझी

भक्ती असेल तर विठोबाल देखील विठ्या,काळ्या म्हण की ! आणखी

एक गोष्ट सांगून ठेवतो. आमचा किट्टू म्हणजे एक अरभाट माणूस आहे

अरभाट !""अरभाट हा एक अतिशय गुणी कानडी शब्द आहे. अरभाट म्हणजे

खानदानी, भव्य, मोठया थाटामाटाचा. मठातील जेवण कसे होते ? अरभाट.

मन्सूरांचे गाणे कसे झाले ? तर अरभाट. ऋषिकेशला गंगा कशी आहे, तर

अरभाट. देवळासमोर झालेल्या नाटकातील हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा

होत्या, तर अरभाट. म्हणजे अगदी क्लास ! ""तुला सांगून ठेवतो. तू एक

गोष्ट कर. किट्टूच्या बाबतीत तू नायडू आणि गडकरी यांच्या भानगडीत

पडू नकोस."" माझ्या पाठीवर थाप मारत करंदीकर म्हणाले.मग अप्पा काळे किंचित पुढे सरकले. आवाज नेहमीचाच ठेवून पण एखादे

गुपित सांगण्याचा आविर्भाव आणत ते डोळे वात्रट करत म्हणाले, ""त्याच्या

जोडीला देविकारणी व गायत्रीदेवी यांच्याविषयी देखील एक शब्द काढू

नको. काय समजले ?"" आणि त्यावर काळे व करंदीकर दोघेही हसले.

देविकाराणी कोण, हे त्या काळी मला काहीच माहीत नव्हते. देविकाराणी

आणि जयपूरच्या गायत्रीदेवी या दोन खानदानी नावांचे जे सुगंधी निळे

चांदणे आयुष्यात पसरले ते फार नंतरच्या काळात. आणि त्या वयात

पसरलेल्या चांदण्याचे गंध कधी ओसरत नाहीत, की त्यांना कधी

कृष्णपक्षाची बाधा होत नाही. मास्तरांचे रागावणे, त्यांनी हाकलून लावणे,

त्यांनी केलेली निबंधाची, हस्ताक्षरांची स्तुती, हे सारे आयुष्याच्या

वेडवाऱ्यात अस्ताव्यस्त उडून गेले. पण त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने एक

कोनाडा गाभाऱ्यासारखा होतो, तो अनुभव वेगळाच होता.त्यांनी `चिमुकलीच कविता' शिकवायला घेतली ती या वर्षांतील शेवटचीच

कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती.""यात एक ओळ फार झगझगीत आहे."" तातू हळूच म्हणाला. तो शेजारी

बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता.कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट

होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे, कच्च्या पोवळ्यांच्यापान नं. 45

चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे. (नखे लाखिया,दात मोतिया,

आणि स्तनाकार पेले, यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता

मोठी झाल्यानंतरची.) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता

आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो. मग कसलीच चाहूल न दाखवता ती

ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे

तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह.

कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी

अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो.नंतर बऱ्याच वर्षांचीगोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे हे

आपल्यापुरते सांगताना ए.ई हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ

आठवताच सारे अंग थरथरून येते. जर त्या वेळी मी दाढी करत असेन

तर चेहऱ्यावरील केस एकदम ताठरतात. ही खूण त्याला पुरेशी आहे. Elfs

and fairies shall dance no more ... Brightness falls from

the air, Queens have died young and fair...एमिली डिकिन्सला जाणवणारे लक्षण निराळे आहे : ""खरी कविता

वाचताना खोल कुठे तरी असा गारठा जाणवतो की विश्वातील सारी उष्णता

जरी त्या क्षणी आपल्यात भरली, तरी तो नाहीसा होणार नाही असे वाटू

लागते.""तसल्या जातीचा एक लहान अनुभव मला आला, मास्तरांनी ती ओळ

वाचली तेव्हा. गणितातील निर्जीव टिंबाला एका दशवर्षेच्या जीवनात

निर्णायक रूप प्राप्त झाले. मास्तरांनी ती कविता अनेकदा शिकवली असेल,

पण ते या ओळीवर थांबले. पुस्तकात बोट ठेवून ते खिडकीपाशी गेले, व

तेथे किंचित रेंगाळून ते परतले. ""या माणसाची भूकच वेगळी होती. त्याला

एखादा पक्षी पाळायचा असता तर त्याला गरूड देखील निर्जीव वाटला असता.त्यानंतर मास्तर पुष्कळ बोलत राहिले. पण आता माझेच मन थाऱ्यावर

नव्हते. दररोजच दिसणारा, खिडकीतून आलेले उन्हाचा पट्टा आज

जास्तच का झळझळत आहे हे मला समजेना. पलीकडील ख्चिश्चनपान नं. 46

स्मशानभूमीतील झाडे स्तब्ध उभी होती खरी, पण त्यांचे सारे लक्ष

माझ्याकडेच होते. कपाळाला एक लहान सुरकुती देऊन, मान किंचित

वाकडी करून ब्रम्हदेव हे दशांश चिन्ह देऊन त्या मुलीचे भवितव्य

ठरवण्याच्या विचारात आहे, आणि त्याच्या आज्ञेची वाट पाहत एक तेजस्वी

टिंब त्याच्यासमोर तरंगत आहे, असे चित्र समोर अस्पष्ट दिसू लागले.नंतर बऱ्याच काळाने माझ्या ध्यानात आले की, ते टिंब म्हणजे तिच्या

हनुवटीवरील तीळ नव्हता, तर ती एक गोंदण्याची खूण होती. म्हणजे ते टिंब

कुठे द्यायचे, हे जरी ब्रम्हदेवाने ठरवले होते, तरी त्याने अर्जुनाप्रमाणे

एका गोंदणकाराला नाममात्र केले होते !""आणखी एक ओळ जाता जाता तसेच चेटुक करून जाणारी आहे,"" जागा

झाल्याप्रमाणे तातू म्हणाला, ""कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले

नाही.""ही किमया होती ती मुख्यत्वेकरून कवीची, पण मला ती दातार

मास्तरांकडून मिळाली म्हणून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता होती.दातार मास्तर मराठीप्रमाणे गणित देखील शिकवत. खरे म्हणजे शास्त्र

आणि भूगोल सोडून सगळेच विषय त्यांनी केव्हा ना केव्हा तरी शिकवले

होते. निरनिराळ्या रंगांच्या खडूंनी भरलेले पेटी उघडून भूमितीच्या

तासाला ते हात चोळत फळ्यासमोर उभे राहिले की, आता येऊ दे समोर

कोणतेही प्रमेय असा आवेश त्यांच्यात असे ! कधी तरी ते एक अजस्त्र

लाकडी कंपास वर्गात आणत, व त्यात एका टोकात खडू अडकवून तो

बाजूला ठेवून देत. इतक्या वर्षांत त्यांनी तो वापरलेला मात्र आम्ही कधी

पाहिला नाही. उलट हातात खडू धरून हात सेलपणे गोल फिरवून आपण

सुरेख वर्तुळ काढू शकतो, असे ते आम्हांला अभिमानाने सांगत. इतर

सिध्दांत-प्रमेये सांगताना ते अनेकदा पायथागोरासच्या सिध्दांताचा

उल्लेख करत. पण अनेक दिवस पायथागोरासची पाळी येईना. तो सिध्दांत

बराच मोठा असल्यामुळे त्यासाठी दोन तास तरी सलग हवे असत. आमची

उत्सुकता वाढतच गेली. पायथागोरास हा एक ग्रीक तत्वज्ञ होता, व त्याचा

पुनर्जन्मावर विश्वास होता. कदाचित तो भारतात देखील येऊन गेला

असेल. पृथ्वी एका स्थिर बिंदूभोवती फिरते, असा त्याचा विश्वास होता.

त्याची देखील एक शाळा होती. पण एखादा विद्यार्थी मध्येच त्याचे शिकवणेपान नं. 47

सोडून गेला, तर त्याने दिलेली फी समारंभपूर्वक त्याला परत केली जात

असे. तो गेल्यानंतर मात्र त्याच्या बसण्याच्या जागेवर थडग्यावर ठेवतात

त्याप्रमाणे त्याचे नाव असलेला एक दगड ठेवला जात असे.अशा पुष्कळशा गोष्टी मास्तरांनी सांगितल्या होत्या. त्याच्या नावावर

असलेला सिद्धांत प्राचीन ईजिप्तमध्ये आधीच माहीत आसावा. पण प्राचीन

इतिहासात काही वेळा कुणाचे तरी श्रेय कुणाला तरीच दिले जाते. ज्याला

आपण अरबी आकडे म्हणतो, ते खरे म्हणजे हिंदू आहेत. प्लेटो नावाच्या

तत्वज्ञाने तर ज्यांना भूमितीची आवड नाही त्यांना आपल्या शाळेत प्रवेश

नाही, असे जाहीरच केले होते. आमच्यापेकी बहुतेकांना प्लेटोने आपल्या

शाळेची पायरी देखील चढू दिली नसती. कारण गणित म्हणजे आकडेमोड

भूमिती म्हणजे रेघामोड, व सगळे मिळून एक असह्य मानमोड एवढीच

आमची कल्पना होती.अखेर वेळापत्रकात मास्तरांनी थोडा बदल करून घेतला, व दोन तास

सलग मिळवले. त्यांनी लग्नातील नवरदेवाप्रमाणे झगझगीत पिवळ्या

रंगाचा एक काटकोन त्रिकोन बोर्डावर काढला. त्याच्या कर्णावर जांभळ्या

रंगाचा चौरस उभा राहिला. बाजूच्या दोन रेषांवरील चौकोन अद्याप कच्चे

असल्यामुळे हिरवट रंगाचे होते. मग पांढऱ्या खडूने रचना तयार झाली.

संथ आत्मविश्वासाने एकेक पायरी दाखवत मास्तरांनी असे दाखवले की

दोन हिरव्या चौरसांची बेरीज जांभळ्या चौरसाइतकी आहे.यापूर्वी मास्तरांनी अनेक सिद्दांत शिकविले होते. जे सिध्द करायचे होते, ते

स्वच्छपणे पटवून दिले होते. त्या QED मध्ये एक काम पार पाडल्याचे

व्यवहारी समाधान होते. पावलापुढे पाऊल टाकून रस्ता निभावला होता

इतकेच. पण पावलांना कधी पंख फुटून खालचा रस्ता खालीच राहिला

नव्हता. Where Kingfishers Catch Fire... खंड्या पक्ष्याच्या

पंखावर सूर्यप्रकाश पडून निळी वीज झळळली नव्हती. कधी लोलकांतून

पाहिल्याप्रमाणे कसल्याच रंगरेषा उमटल्या नव्हत्या. मास्तरांनी खडूचे

हात झाडले व खुर्चीत बसून त्यांनी तपकिरीची डबी उघडली.मी बोर्डाकडे पाहत होतो. त्या क्षणी काय झाले कुणास ठाऊक,

हादरल्यासारखे होऊन सगळा वर्गच वितळल्यासारखा झाला. समोर एक

भव्य काळा पडदा, त्यावर जांभळा व हिरवा असे दोन चौरस हळदीपान नं. 48

त्रिकोणाभोवती झळाळत उजळले. दोन लहान चौरस भिरभिरत जांभळ्या

चौरसात मिळून गेले. मग मोठा जांभळा चौरस थरथरत चंद्रज्योतीप्रमाणे

फुटला. आणि त्याचे दोन नवे लहान लहान चौरस झाले. ते आता रोखठोक

स्वतःच्या स्वतंत्र सत्याने प्रकट झाले होते. म्हणजे म्हटले तर एक, किंवा

दोन आणि खरे म्हणजे दोन एकच व एकच दोन. हे सारे एकेक पायरी

समजावून घेत, सारे स्वच्छपणे समाजावून घेण्यापेक्षा सर्वस्वी निराळे होते.

हा एक अणुसाक्षात्कार होता.झेन बुध्दवादातील Satori, साक्षात्कार याअर्थी वापरली जाणारी

Epiphany ही कल्पना, एका देवदत्त क्षणी मी व इतर जग यांतील दुरावा

जळून जाऊन मी आणि माझे जग, I and it जाऊन I and thou, हे

सारे नंतर खूप वर्षांनी वाचनात आले. तसला अनुभव घेण्याचे मला भाग्य

कधीच लाभले नाही. पावले धुळीतच रखडत ठेचाळत राहिली. राजहंस

कधीच खाली उतरले नाहीत. पण त्यांचे एक झरझर प्रतिबिंब मात्र

मानसजलावर क्षणभर सरकून गेले. त्या क्षणी अशा तऱ्हेचा अत्यंत दुर्मिळ

मूल्यवान व अगदी कणरूप अनुभव मला स्पर्श करून गेला हे मात्र खरे.

घंटा झाली व मी भानावर आलो. मास्तर निघाले, पण जाता जाता ते

म्हणाले, ""काय भोपळेबुवा, डुलकी लागली होती वाटतं ? मी दोन प्रश्न

विचारले तुला.""एरवी मला थोडी शरम वाटली असती, पण त्या क्षणी मात्र मी अगदी

निर्विकार, अलिप्त होतो. पुढचा तास आपटे मास्तरांचा होता. मी पुस्तके

घेऊन ख्चिश्चन स्मशानभूमीत आलो. तेथे कोपऱ्याच जी दोन थडगी होती

त्यांच्यावर सपाट गुळगुळीत अशी मोठी फरशी होती. तेथे स्टीफन माळी

काही तरी करत होता. आता माझी त्याच्याशी चांगलीच ओळख झाली होती.

तो हसला व झाडणीने फरशीवर पडलेली वाळलेली पाने बाजूला करून

तो दुसरीकडे गेला.मी फरशीवर पसरलो. कसली बोच नाही, हाव नाही. हातमोजा उलटा

केल्याप्रमाणे सगळेच वेगळे, उलटे झाले होते. त्या क्षणी देखील मनातील

ती उत्कट नीरवता मला प्रकट करता आली नसती. इतक्या वर्षानंतर उरली

आहे ती फक्त स्वतःलाच जाणवणारी आठवण.अशा अनुभवाचा भव्यतेशी किंवा स्वतःच्या मोठेपणाशी काडीचाही संबंध

नसतो.पान नं. 49

तसला अनुभव पॅसिफिक महासागर प्रथमच पाहिलेल्या कोर्टेझला

(खरे म्हणजे बाल्बोआला) आला. असेल. अणुबबचा पहिला चाचणी स्फोट

पाहिल्यावर दशकोटी सूर्यांची ओपेनहीमरला आठवण झाली व तो हरवून

गेला. तर जेफरीसारख्या साध्या पत्रकाराला असला अनुभव तो एका

टेकडीवरील उतरणीवर गवतात पसरला असता आला होता. नंतर फार

वर्षांनंतरची गोष्ट आहे. एका महान साधकाची कॉलेजला भेट होती.

स्टाफरूमसमोर गाडी थांबली. तेथेच एक रानझुडूप वाढले होते आणि

जगण्याची ईर्षा दुर्दम्य असल्यामुळे त्याला कोवळी, लालसर पाने फुटली

होती. जवळून जाताना साधक एकदम थांबले. त्यांचे हातपाय थरथरू

लागले व त्यांनी उपरणे तोंडावरून ओढून घेतले. ते समाधीत गेले होते.

आम्ही त्यांच्या अशक्त देहाला उचलून देहाला उचलून पुन्हा गाडीत ठेवले, व गाडी थेट

टोकापर्यंत नेली. थोडया वेळाने ते परतले,तेव्हा पुन्हा ते झुडुपाजवळ आले.

पण या वेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले देखील नाही. आता त्याची

काही

गरज उरली नव्हती. एका क्षणी ओळख पटून गेली होती.त्यानंतर मी पायथागोरासचा सिध्दांत दोन-चार मित्रांना समजावून

सांगितला. माझ्याजवळ योग्य ते शब्दच नसावेत. त्यांनी माना डोलावल्या.

पोस्ट ऑफिस पाच वाजता बंद होते, पूना मेल सहा वीसला येते, असलीच

माहिती मी देत असल्याप्रमाणे ते निर्विकार राहिले. दोघांनी तर तो सिध्दांत

आपल्याला समजला आहे असे सांगितले. पण समजणे निराळे, जाणणे

निराळे. एक लाल पान खुडून कपाळावर चिकटवणे निराळे, आतून काही

तरी उसळून सर्वांगला लाल लाल पाने फुटल्याप्रमाणे वाटणे निराळे.

कदाचित माझ्यातच हा उणेपणा असावा. खुद्द मास्तरांना देखील हाच

अनुभव पुन्हा हुकूमेहुकूम देता येणार नाही, कारण असला क्षण म्हणजे

स्थळ, काळ आणि देवी इशारा यांचा एक अगम्य स्फोट असतो. त्यानंतर

काय ? त्यानंतर काय ? काय ? तर काही नाही, केवळ निःशब्दता,मूकता.

विटगेनन्स्टीनने हे बरोबर ओळखले. त्याबद्दल तो स्तब्ध राहिला. तेथे

शब्दांची मिजास संपते, तत्वचर्चेचा दिमाख बेगडी ठरतो, आणि

वटवटणारी जीभ निरर्थक चुकचुकणाऱ्या पालीप्रमाणे वाटते.असले काही तरी क्षणिक, किरकोळ प्रथमच मला अनुभवाला आले होते.

योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिले धूसर चित्र आणि हा क्षण यांत

गणिताचाच स्पर्श होता. हनुवटीवरील दशांश चिन्ह भाग्य ठरविणारे होते,पान नं. 50

तर पायथागोरासच्या चौरसांनी एक नवीनच खिडकी किंचितकाल

उघडली होती.मग मॅट्रिकची परीक्षा संपली. परीक्षेपुरती गोळा केलेली माधुकरी तिच्याच

झोळीत टाकली. आता देणे-घेणे काहीच उरले नाही. जाताना शाळेने

आम्हांला निरोप दिला नाही. जाताना आम्ही देखील फारसे कुचंबलो नाही.

शेवटी पदरी राहिले काय?तर सायमनचे कुर्रेबाज काव्यमय इंग्रजी, सेंटचा मंद वास, त्यांनी

शिकवलेली ग्रेची कविता, दातार मास्तरांनी दिलेले दशांश चिन्ह

पायथागोरासचा सिध्दांत, थडग्यावरील फरशीवर पडून अंगावरून जाऊ

दिलेली आत्मरत सुखाची झुळूख; शेवटच्या दिवशी स्टीफन माळ्याने

दिलेली Scented Giranium -ची फांदी व एक पान चुरगळून

नाकाजवळ आणलेला त्याचा सुगंध. बस्स एवढेच.कॉलेजमध्ये तर सगळाच आनंद होता. कृष्णस्वामींनी ग्रीक शोकन्तिकेचे

दर्शन घडविले तेवढेच काही पदरात पडले. एका प्राध्यापकांनी कॉवरॅड,

हार्डी यांच्यासारखे अवजड लेखक परीक्षेला लावण्याऐवजी पी.जी.

वुडहाऊस, जेरोम के जेरोम असे लेखक लावायला हवे असे सांगितले.

आणखी एकाने कीट््सच्या कवितांचे सारांश देऊन वर्ष रेटले. आणखी एक

बहुधा पिऊन लालबुंद होऊन additional English शिकवायला येत,

आणि Through literature To L ife हे टेक्स्टबुक, damned silly

book म्हणून तास संपवत. जुन्या मित्रांपेकी कुणीच या कॉलेजमध्ये

बरोबर आले नाही. प्रभाकर सायन्ससाठी आपल्या काकांकडे गेला. पाच

वर्षे तातू सामंत माझ्या शेजारी बसत होता. आता बोक्यासारखे दिसणारे

एक धनिक बाळ बसू लागले. हा दर तासानंतर खिशातून कंगवा काढून

केस विंचरत बसे. तो दररोज एका नव्याच मुलीच्या प्रेमात पडे. एखादा नवा

राजकीय पक्ष अस्तित्वात आला की तो त्यात सामील होई व पंधरा दिवस

त्यात राही. एकदा सुभाषचंद्र बोस भाषणाकरिता आले असता त्याने

त्यांच्या स्वाक्षरीसाठी मोठया लाडिकपणे एक छोटी वही पुढे केली, तेव्हा

ती त्यांनी दूर फेकून दिली. हळूहळू कॉलेजात विद्यार्थी-खेळाडूंऐवजी

युवकच येऊ लागले आणि चार वर्षे संपली, त्या वेळी सुटका झाली असेच वाटलेपान नं. 51

त्या वेळी बराच विरंगुळा मिळायचा तो संध्याकाळी करंदीकर आजोबा

आणि अप्पा काळे घरी आले म्हणजे. करंदीकर आजोबा नियमितपणे घरी

येत. दादांना पुष्कळदा घरी यायला वेळ लागे, पण ते आल्याखेरीज नि

त्यांना भेटल्याखेरीज करंदीकर जात नसत. काही वेळा ते अधीरपणे

विचारत, ""काय रे, चित्रगुप्ताला आज इतका उशीर का ?"" दादा

वकिलाकडे काम करत. त्यांनी पाचसहा वकिलांकडे काम केले होते.

त्यांपेकी एकावर करंदीकरांचा फार राग होता व ते त्याला यम म्हणत.

यमाचा कारकून म्हणून दादा चित्रगुप्त. खरे म्हणजे दादा त्या ठिकाणी सहा

महिने टिकले नव्हते व त्यात देखील दोन महिन्यांचा पगार बुडाला होता.

पण करंदीकरांना मात्र ते कायमच चित्रगुप्त राहिले.दोनचार दिवसांनी अप्पा काळे येत व मग बोलताना दोघांचीही घड्याळे

मरत. आजोबांना घेऊन जाण्यासाठी आलेला पिशव्या विठोबा समोरच्या

कट्ट्यावर बसून कंटाळे, व पेंगू लागे. मग त्याला मागच्यादाराने आत

बोलावून आई त्याच्यापुढे ताट ठेवत असे. मी चौथीत जाईपर्यंत कित्येकदा

दातार मास्तर देखील येत असत. मग तर रात्री आठ काय, नऊ काय,

वाजून जात. स्वयंपाकघरात आई व आजी पाय लांब करून जमिनीवरच

बसून बोलत बसत. पण जेवणाची हाक येईपर्यंत काय करावे, हा प्रश्न

माझ्या एकटयापुढेच असे. दादा फारसे बोलत नसत, पण बाकीच्यांच्या

बोलण्याला खूप हसत व मधून मधून आत जाऊन चहा, सुपारी, लवंगा

आणत. इतक्या आनंदाने दुसऱ्यांना चहा देणारा दुसरा माणूस मी

आजपर्यंत देखील पाहिला नाही.करंदीकरांच्या पायात बूट असल्याने ते सोप्याचा उंबरा ओलांडून आत येत

नसत. अप्पा काळे तर स्पष्टच सांगत की आपण खुर्चीत बसलो की फक्त

जायच्या वेळीच उठणार, त्या आधी नाही ! मास्तरांना चहा-सुपारी काहीच

नको असे. काळे यांच्या शब्दांत ""त्यांची गन-पावडरची डबी जवळ असली

की त्यांना मोगल साम्राज्य तुच्छ वाटे."" मग मी चौथीत गेलो, व दातार

मास्तरांचे आमच्या घरी येणे बंद झाले. आता मी त्यांचा विद्यार्थी होतो,

आणि एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मनमोकळेपणाने वाटेल ते बोलावे,

हे त्यांच्या वागणुकीत बसत नव्हते. अनेकदा दाद त्याबद्दल हळहळत.

पान नं. 52

बालगंधर्व-केशवराव भोसले यांच्या संयुक्त प्रयोगाप्रमाणे ही तीन माणसे

बोलत राहतात, असे ते म्हणत.अप्पा काळे चार ते सहा क्लबमध्ये असत, व कुठला तरी एक गावठी रमीचा

डाव खेळत. त्यात दररोज पाच-सात आण्यांचा फार तर व्यवहार होत असे.

ते आपल्याला मिळालेला पेसा कधी घेत नसत, पण गेलेल्या पेशाची उधारी

ठेवत नसत. काही आणे गेलेल्या दिवशी क्लबपासून आमच्या घरापर्यंतचा

रस्ता त्यांच्या आरडाओरड्याने लालभडक होत असावा. त्यांना स्वतःचे

असे घर नव्हतेच. स्वतःच्या दोन खोल्या आणि शेजारच्या छोटया दुकानाचे

भाडे एवढेच त्यांचे ऐहिक वेभव होते. त्यांना एकुलती एक बहीण होती, व

ती सोलापूच्या शाळेत काम करत असे. अप्पा काळे दोनच गोष्टी निष्ठेने

करत. ते पत्ते खेळत व सिगरेट ओढत. सिगरेटमुळे त्यांच्या मधल्या बोटाचे

एक पेर काळसर-तपकिरी झाले होते. मी एकदा जादापणा दाखवून

विचारले, ""तुम्ही सिगरेट फार ओढता का ?""का कुणास ठाऊक, ते मला नेहमी `अहो-जाहो' म्हणत. ते म्हणाले, ""अहो,

सिगरेट नसती तर मी केव्हाच खलास झालो असतो. बोट असे काळे का

होते, हे नंतर कधी तरी तुम्हांला समजेल. पण सिगरेट ओढण्याची सुरूवात

मात्र कधी करू नका, महाराज.""त्यांची ही गोष्ट नंतर मी कधी ऐकली नाही. वेतागाच्या, दुःखाच्या

वेळी मी आयुष्यभर सिगारेटचा आश्रय घेतला. सिगरेटइतक्या

सहनशीलतेने आपले कुणी कधीच ऐकून घेत नाही. तिला स्वतःचा असा

आवाज नाही, मत नाही, उपदेश नाही. तिच्यात पत्नीची घरगुती सततची

बडबड नाही, की आपल्याला सतत बोटावर नाचवण्याचा प्रेयसीचा आचरट

प्रयत्न नाही. त्यामुळे सिगरेट सोबत नाही. एकादे अरभाट पुस्तक

किंवा शास्त्रीय संगीताची कुलीन मेफल सोडल्यास !पण त्यांची एक गंमत होती. आमच्या घरात त्यांनी कधी सिगरेट ओढली

नाही. पायरीवर पाऊल पडले की सिगरेट गटारात पडलीच. दहा मिनिटे

सिगरेटशिवाय न राहणारे काळे तीन-तीन तास तिला स्पर्श न करता गप्पा

मारत बसत.एकदा करंदीकर आजोबांनी शाहू नगरवासी कंपनीचा उल्लेख केला.पान नं. 53

गणपतराव जोशांचे नाव घेतले आणि कौतुकाने मान हलवली. अप्पांनी

खुर्ची खस्सदिशी पुढे ओढली. कोणताही महत्वाचा मुद्दा मांडायचा असला

की अप्पा तसे करत. त्यावर घाबरल्यासारखे करून करंदीकर म्हणाले,

""ऐकलेत का भीष्माचार्य, तुम्ही मारे ज्यांचा धोशा लावता ते

गणपतराव जोशी, बालगंधर्व, कोल्हटकर, केशवराव भोसले, नाना फाटक

ही सारीच मंडळी अगदी कुचकामी आहेत. अभिनय म्हणजे काय हे

कुणालाच साऱ्या जन्मात कधी समजले नाही. अहो, त्यांच्यापेक्षा एक गोटा

नारळ जास्त चांगला नट ! सगळा कंजार-कचका, आरडाओरड नुसती.

`माझं नाव घनश्याम' एवढी साधी गोष्ट सांगताना एवढा खणखणीत आवाज

लावण्याची काय गरज आहे ? आम्ही देखील इतके बुद््दू की त्या वेळी

आमच्या अंगावर झरकन काटा उठायचा !""""पण काळोबा, नाटकात थोडा नाटकीपणा यायचा नाही तर तो यायचा

केव्हा, मंत्रपुष्पाच्या वेळी ?"" टेबलावर मूठ आपटत करंदीकर म्हणाले.""द्रोणाचार्य, आयुष्यभर तुम्ही पगडी वापरलीत, पण फिरवायची कशी हे

मात्र शिकून घेतले नाही. आजचे नाटक कसे असते माहीत आहे ?एक

मिशाळ नट स्टेजवर बाजूला जातो, आणि प्रेक्षकांकडे पाठ करून बसतो,

आणि उगाच होय की नाही असा एक निःश्वास सोडतो. तो पुन्हा प्रेक्षकांकडे

येतो, त्या वेळी त्याच्या मिशा थोड्या विसकटलेल्या असतात. त्यावरूनच

अत्यंत दारूण अशा संकटामुळे त्याचे जीवन उद््ध्वस्त झाले आहे असे

आम्ही मुकाटयाने समजावयाचे. आणि ती प्रसिध्द नायिका कोण ती मसणी !

ती नाकपुड्या काय सुरेख थरथरवते म्हणता ! त्या थरथरू लागल्या की

तिला आवेग आनावर झाला आहे, असे आपण मानायचे, व आता ती आपले

व्यक्तिमत्व शोधण्यासाठी चौथ्या पुरूषाबोरबर सिंगापूरला जाणार हे

आपण ओळखायचे. तिची सूट-केस नेहमीच तयार असते. आजच्या नाटक

कंपनीत एखादा पडदा कमी असेल, फर्निचर नसेल, पण एक सूट-केस

तयार नाही असे मात्र कधी घडणार नाही.""पान नं. 54

""काळोबा, हा काय आचरटपणा आहे ?"" करंदीकर म्हणाले, ""स्टेजवर

प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेल्याचा मिशाळ निःश्वास आम्ही कसा

ऐकणार ? आणि ती कोण पूतनामावशी, तिच्या थरथरणाऱ्या नाकपुडया

मागल्या रांगेतील प्रेक्षक काय दुर्बीण लावून पाहणार ? आणि तसे पाहून

घायाळ होणार ? अहो, म्यानात नवी युरोपियन झाडणी ठेवणारे धेर्यधर !

ग्रीक नाटकांत नट मुखवटे वापरत असत. उंची वाढवण्यासाठी पायाखाली

ते लाकडी ठोकळे बांधत. आणि केवळ शब्दांच्या फेकीने, गीत-गायनाने ते

दहा-पंधरा हजार प्रेक्षकांना उघडया थिएटरमध्ये तासन्् तास खिळवून

ठेवत असत, माहीत आहे ? अहो गलपोजी, तुमचे ते नेपथ्या, ती

प्रकाशयोजना सारे घाला खड््डयात ! नाटक जगते ते भाषणावर,

संवादावर ! असा एक धाडसी प्रयोग कधी कुणी केला नाही, पण करून

पाहायला हरकत नाही. समोर एक मोठा पडदा लावायचा आणि त्यामागून

केवळ भाषणे ऐकवायची. पात्रांची थोबाडे समोर नकोत. बघा राजसंन्यास

रंगते की नाही !""अगदी तुळशी देखील पडद्यामागेच का ?"" अप्पांनी खवचटपणे

विचारले.""""तुळशी देखील नव्हे, राजश्री,विशेषतः तुळशी. अरे संभाजीसारख्या

उमद्या वीराने सारे आयुष्य जिच्यावरून ओवाळले ती तुळशी तुम्ही प्रत्यक्ष

दाखवणार तरी कशी ? ती जलसुंदरीप्रमाणे वर आली, आणि गडकऱ्यांच्या

कल्पनेत जगली. तशीच ती प्रत्येकाच्या कल्पनेत तेजाळत राहू दे."" काळे

मोठ्याने हसले व त्यांनी टाळी वाजवून खुर्ची आणखी पुढे सरकवताच

करंदीकर मागे सरकले.""राजसंन्यास म्हणातच एक आठवण झाली,"" अप्पा काळे म्हणाले, ""तीन

वर्षांपूर्वी राजसंन्यास नाटकाच्या जाहिराती लागल्या होत्या, आठवते का

व्यासमुनी ? आणि तुळशीचे काम कोण करणार होते माहीत आहे ?तर

चाळशी घातलेल्या मेंढीप्रमाणे दिसणारी ती प्रसिध्द नटी ! बोला, आला की

नाही प्रळयकाळ ? महाराज, माझ्यावर विश्वास ठेवा. अगदी शपथ घेऊन

सांगतो, मी अंगारा लावला नाही. पण त्या दिवशी मात्र आम्ही धापा टाकत,

धावत चार मेलांवरच्या स्वयंभू माळ मारूतीकडे गेलो, आणि त्याच्या समोर

अंग टाकले.पान नं. 55

त्याला नवस केला, त्याला साकडे घातले. कधी नाही ती त्याने

आमची याचना ऐकली. ऐन वेळी प्रयोग रद्द झाला. तेव्हा कुठे आम्ही शुध्दीवर

आलो, आणि नारळ फोडून सगळ्यांना खोबरे वाटले.""""आम्ही ?म्हणजे आणखी कोण होते तुझ्याबरोबर ?"" थोडया आश्चर्याने

करंदीकरांनी विचारले.त्या प्रश्नाची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे अप्पा हसले व त्यांनी

टेबलावरची पगडी गर्रकन फिरवली. ते म्हणाले,"" आम्ही म्हणजे मी आणि

गडकरी !""अप्पा काळेंनी आपल्यासाठी काम करावे यासाठी चित्रपटनिर्मात्यांनी काही

त्यांच्यामागे फारशी गर्दी केली नसती. साधारणपणे बोटभर दाढी वाढवलेली,

व अंगात खादीचा लांब सदरा. मुळातच खादी हे कापड पूर्ण स्वच्छ असले

तरी मवाळ मळकट दिसते. एकदा एका माणसाने आपणाला तहान लागली

आहे असे म्हटल्यावर एका सज्जनाने त्याला पेलाभर पाणी दिले तेव्हा तो

उसळून म्हणाला, I said, I am thirsty, not dirty !"" अप्पा काळे

आग पाणी घेत नसत, पण त्यांना पाण्याविषयी दुःस्वास तेवढाच होता.

अप्पा अशा स्वरूपात आले की अनेकदा करंदीकर विचारत, ""काय एखाद्या

ज्वलंत प्रश्नावरील नाटकात काम करणार की काय ? त्यातील

नायकासारखे दिसता !""""ते जाऊ द्या हो कृपाचार्य. तुमचा चहा वगेरे मी येण्यापूर्वीच संपन्न झालेला

दिसतोय.""""संपन्न ?हे काय नवीन काढले आहेस ?""""महर्षी, मराठी भाषा टिकवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे, गोड मानून

घ्यावा.""खुर्चीत जास्तच रूतत काळे म्हणाले,""आजकाल मराठीत समारंभ

साजरे होत नाहीत, तर संपन्न होतात. उद्योगधंद्यात कामगार नसतात, तर

असतात कर्मचारी. पोलिस उपाययोजना करत नाहीत, तर करतात

कारवाई.""एखाद्याचे ज्ञान कितीही असो असे म्हणायचे नाही, तर त्याचे ज्ञान भले

कितीही असो, असे म्हणायचे. होय का ? असे विचारणे म्हणजे तरपान नं. 56

बावळवटपणाची कमाल आहे. तर `अच्छा अच्छा' असे राष्ट्रीय एकात्मतेने

म्हणायचे. याच माणसांना एकादा इग्रंजी शब्द आला तर मात्र एका

स्वयंचलितेपुढे आडवे व्हावेसे वाटते ! सरकारी-नव्हे चुकलो-शासकीय

मराठी तर अमरच आहे. तिला आमचे कोटी कोटी वंदन ! अलीकडे मुलगी

पाहण्याचा कार्यक्रम कमी होत चालला आहे. पण असलाच तर मुलीला

शासकीय मराठीतील एका उताऱ्याचा अर्थ सांगता येईल का, असं

विचारावे. ती जर `होय' म्हणाली तर हे वधूइच्छुका, तेथून तत्काळ पलायन

कर. एवढी असामान्य प्रतिभावंत स्त्री तुला बिलकुल पेलायची नाही.करंदीकर हसत म्हणाले,"" मला अर्थ माहीत नाही, तुम्हीच तो घरगुती

मराठीत सांगा, असे ती म्हणाली तर पंचाईतच व्हायची !""""पंचाईत कसली ? ती संतोषाचीच गोष्ट होईल. त्याबाबत आपला तर पूर्ण

बोऱ्या उडाला आहे हे स्पष्ट सांगावे. बरे का, समान बौध्दिक पातळीवरचे

हे लग्न सुखाचेच होण्याची शक्यता आहे.पण एक गोष्ट मात्र मान्य केली

पाहिजे. सरकारला शासन म्हणणेच जास्त योग्य आहे, हे मात्र पदोपदी

जाणवते ! हो, आणखी एक नवीन ऐकले का तुम्ही मुनिवर्य ? आता `एकच

प्याला' हे नाटक साध्या कपड्यांत होणार आहे ""दादांनी आणखी एक चहा आणून ठेवल्यावर काळे खूष झाले. एका लहान

कपावरच करंदीकरांचे चहाचे अवसान संपत असे. करंदीकर म्हणाले,

""म्हणजे सुधाकर फेडेड जीन्स घालणार, सिंधू स्लीव्हलेस घालून गोल

पातळात हुंदके देत `कशि या त्यजू पदाला' असे म्हणणार की काय ? आणि

जुनेरे नेसून दळण दळणाऱ्या सिंधूचे काय मग ?""खोटया वेतागाने अप्पांनी मान हलवली. ते म्हणाले, ""आजोबा, आता

तुमच्या पगडीसह तुम्हांला जुन्या बाजारात ठेवले पाहिजे. आता नव्या

नाटकात सिंधू एक पाय जात्याभोवती सोडून दळण जळणारच नाही,

समजले ? त्या सीनमध्ये खरोखरच एक मोलकरीण पाच मिनिटे दळत

बसेल व सिंधू स्टेजवर या कडेपासून त्या कडेपर्यंत केवळ येरझाऱ्या घालत

राहील, आणि छोट्या हातरूमालाने कपाळ टिपत राहील. अहो, गाण्याला

जसा प्लेबॅक असतो ना, तसा अभिनयाला देखील असा प्लेबॅक द्यायचा;

समजले ?""
------------------------------------------------------------------
पान नं. 57

""अरे, पण मग ती स्लीव्हलेस गुळव्वा पाहिजे कशाला ?""""अहो द्वेपायन, आता तुमच्यापुढे करू तरी काय ? जर ती बया नसेल तर

रंगभूमीवर मेरूमांदार गदगदा हलवून सोडणारी क्रांती कोण घडवणार?

मी फार वर्षांपूर्वी `द्रौपदी वस्त्रहरण' नाटक पाहिले होते. द्रौपदीचे काम

करणारा नट म्हणे अत्यंत तलम अशी सात पातळे नेसत असे व मग

दुःशासन त्यातील एकेक ओढत असे. त्या वेळी आम्हांला फार भीती

वाटायची, एखाद्या दिवशी पातळे मोजताना चूक झाली तर काय होईल ?

तसे घडले असतो तर मराठी नाटक बऱ्याच आधी एकदम वयात येऊन

बसले असते ! ही आपत्ती टाळण्यासाठी मी एक प्रतीकात्मक पण

क्रांतिकारक उपाय सुचविला होता. तो त्यांनी स्वीकारला नाही ही गोष्ट

निराळी. त्यामुळे नाटकाचा पहिला क्रांतिकारक म्हणून मला मिळायचे श्रेय

हरपले. द्रौपदीने एकच पातळ नेसायचे., पण एक-दोन आकडे असलेले

वाटेल तितके हातरूमाल कमरेला खोचायचे. दुःशासनाने एक हातरूमाल

ओढून बाजूला टाकला की एक वस्त्र गेले. हा प्रकार दुःशासन अक्षरशः

दमेपर्यंत अथवा कंटाळेपर्यंत चालू ठेवता येतो.""""असलाया नाटकाला कवडी तिकीच तरी प्रेक्षक ढंकून बघणार नाहीत.

मग एका हातरूमालावर प्रेक्षक असे लिहून तो समोर खुर्चीवर ठेवावा

लागेल."" हात झाडत करंदीकर म्हणाले.त्यांच्या गप्पा चालूच राहिल्या व कुणाला जेवणाची आठवण होईना. घरी

तर इतरांची संकष्टी होती. आणि चंद्रोदय सव्वादहानंतर असल्याने

स्वयंपाकघरात सारे शांत होते. माझ्या डोळ्यांपुढे मात्र भुकेमुळे चांदण्याच

काय, चंद्र प्रकाशू लागले होते. मला एकदम कांदेविक्याच्या

कवितेची आठवण झाली. त्याने बहुधा आपली कविता संकष्टीच्याच एखाद्या

अनुभवाने लिहिली असावी. कारण उपाशी पोरांच्या तोंडाकडे पाहत

संथपणे उगवत स्वतःशी हसणारा चंद्र बिलंदरच असला पाहिजे. एखादा

झटका आल्याप्रमाणे अप्पा काळे मध्येच खाडकन उभे राहिले व

घड्याळाकडे पाहत म्हणाले, "" बाप रे, नऊ वाजायला आले की !""""आता जेवून जा, किंवा आज इथेच राहा."" दादा म्हणाले. ""मात्र जेवायला

दहा वाजून जातील""

पान नं. 58

""इतर वेळी राहिलो असतो, चित्रगुप्त! पण संध्याकाळपासून काय झाले

आहे कुणास ठाऊक, पोटात वारूळ उठल्याप्रमाणे झाले आहे. आतड्याला

गाठ बसल्याप्रमाणे होत आहे. ते विसरावे म्हणून येथे येऊन वात्रट बोलत

बसलो झाले. आता मात्र खोलीकडे गेलेच पाहिजे. असा आकांत वाटत

आहे. पण हे बघ, मी कधी तरी मुद्दाम येणार आहे- अगदी

इच्छाभोजनासाठी. तीळ लावलेली बाजरीची गरम भाकरी, भरल्या

मसाल्याची वांग्याची भाजी, खूपसे दही आणि पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर,

बस्स, मग चित्रगुप्त, तुला एक महिना भरपगारी रजा द्यायला सांगेन तुझ्या

मालकाला.""पण त्या वेळी अप्पांकडे पाहून कुणालाही हसावेसे वाटले नाही. सगळा

जगाने त्यांना बाहेर काढले आहे, व ते त्याच्याकडे रोखून पाहत आहेत.

असे एकटे, बावरलेले दिसत होते.अप्पा निघालेले पाहून करंदीकर देखील उठले. त्यांनी दारातूनच `विठोबा

म्हणून हाक मारली. विठ्ठलने समोरच्या कट्ट्यावर आरामात पाय पसरले

होते. हाक ऐकून तो धडपडत उठला, व आजोबांबरोबर निघाला. हा विठ्ठल

अगदी अनाथ होता. तसे पाहिले तर त्याला जवळचे कुणीच नव्हते. पण

करंदीकरांनी अतिशय दूरचे असे कुठले तरी नाते काढले होते, व त्याला

एका खासगी अनाथाश्रमातून आणून घरी ठेवले होते. आश्रिताचे त्याचे

आयुष्य, त्याला घरात एखाद्या जुन्या झाडणीपेक्षा जास्त किंमत नव्हती.

पाहावे त्या वेळी तो हातात पिशव्या घेऊन बाजाराकडे तरी जात असे किंवा

तेथून परतत तरी असे. त्यामुळे आम्ही त्याला `पिशव्या विठोबा ,म्हणत

असू. तो नेहमी चिरडलेला, घामट असा दिसे. तो माझ्यापेक्षा एखाद-दुसऱ्या

वर्षांनेच मोठा असेल. तो पूर्ण मोफत असलेल्या एका जुनाट,

नायटयासारख्या दिसणाऱ्या शाळेत जात असे. पण तो कधी आमच्यात

येऊन बसला नाही. थट्टा-मस्करी केली तरी तो कधी चिडला नाही. तो

घरावरून जाताना दिसला की त्याला हाक मारून आई त्याला काही तरी

खायला देत असे. पण त्या वेळी देखील त्याला पिशव्या घरी लौकर

पोहोचवण्याचा घोर लागलेला असे. तो निघाला की घाईघाईने जाऊन

त्याच्या दंडाला चिमटा काढणे ही माझी `गुड नाइट' म्हणण्याची पध्दत

होती, व विठ्ठलने त्याला कधी हरकत घेतली नाही.

पान नं. 59

काळे उठले व पायरीवर आले, पण मध्येच थांबून दादांना म्हणाले,

""ताबडतोब गेले पाहिजे, असे दावे ओढले जात आहे. पण जाऊ नये असेही

वाटते."" मग ते खाली उतरले व पहिले पाऊल रस्त्यावर पडताच त्यांनी

सिगरेट पेटवली. मी लगबगीने विठ्ठलजवळ गेलो, आजोबा जवळ असता

तो ओरडणे शक्य नव्हते. मी चिमटा काढण्यासाठी बोटे पुढे केली, व थोडे

हसत तो बाजूला वळला. तेव्हा माझ्या बोटात चिमूटभर कापड राहून चिमटा

चुकला. सदरा फाटला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू पुसले गेले व तो म्हणाला,

""आता उद्या शाळेला काय रे ?"" तोच आजोबांनी त्याला पुन्हा हाक मारली,

व तो लगबगीने त्यांच्याबरोबर चालू लागला.नंतर चार-सहा दिवस अप्पा काळे आलेच नाहीत. करंदीकरांचे बोलण्यात

लक्ष लागेना. एक लहान कप चहा घेतल्यावर दोन-चार मिनिटे बोलून ते

निघून जाऊ लागले. आणखी दोन-तीन दिवस गेल्यावर दादा बोलून देखील

अस्वस्थ झाले. ""बाहेर कुठे जायचे असेल तर आम्हांला तसे

सांगितल्याखेरीज जाणार नाही, काळोबा, "" असे ते दोन-चारदा म्हणाले.

क्लबमध्ये देखील अप्पांचा पत्ता नव्हता. त्यांनी खोलीकडे जाऊन पाहिले.

तर खोलीला कुलूप. शेजारच्या दुकानदाराने सांगितले की त्यांची बहीण

फार आजारी आहे, म्हणून तार आली होती. ती त्यांने घेतली व अप्पा

आल्याबरोबर त्यांना दिली. ती वाचल्यानंतर खोलीचे कुलूप देखील न

उघडता अप्पा स्टेशनकडे गेले व रात्रीच्या गाडीने निघून गेले.

दादांनी आपल्या एका मित्राला सोलापूरला पोस्टकार्ड पाठवले व चौकशी

करून कळवायला सांगितले. तिकडून आलेले पत्र हातात पडले, तेव्हा दादा

जेवायला बसणार होते. पण त्यांनी ताट बाजूला सारले व ते बाहेर खुर्चीत

जाऊन गप्प बसले. काही विचारले तर एक नाही की दोन नाही. पण त्यांच्या

डोळ्यांत पाणी दिसत होते. ""अप्पांच्या बहिणीचे काही बरे-वाईट झाले

का ?"" आईने दोन-तीनदा विचारले, तेव्हा दादांनी तिला पत्रच वाचायला

दिले.बहीण फार आजारी म्हणून अप्पा तिकडे गेले. तिची अवस्था अतिशय

कठीण आहे असे डॉक्टरांनी सांगितले, तेव्हा घरी परतल्यावर अप्पांनी

झोपेच्या गोळ्या घेतल्या व उठलेच नाहीत. ""ती माझी एकुलती बहीण,

आम्ही एकत्र उपास काढले आहेत. आता माझ्या डोळ्यांसमोर तिचे काही

झालेले मला झेपणार नाही."" अशी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.पान नं. 60

अशाच दोन चिठठया करंदीकर व दादा यांच्या नावाने होत्या. दादांच्या

चिठ्ठीत एक वाक्य जादा होते, ""माझे इच्छाभोजन राहूनच गेले.""

करंदीकरांच्या चिठ्ठीतले जादा वाक्य होते,""आपली मेफल संपली.""दादांच्या मित्राने चिठ्ठयांतील मजकूर मुद्दाम लिहून पाठवला होता. त्यानंतर

सारे विपरीतच घडले. त्या आजारातून बहीण सावरली. नंतर चार वर्षांनी

जिना उतरत असता पाय घसरून पडली व तिच्या मांडीचे हाड मोडले.

नंतर काय गुंतागुंत झाली कुणास ठाऊक, ती भ्रमिष्टच झाली. ती

कागदाच्या चिठोऱ्यांवर सतत रेघोट्या खरडायची व सांगायची,""एकदा

तरी इकडे येऊन जा म्हणून भावाला पत्र लिहीत आहे.""नंतर तिला त्यातच

कोमा झाला व ती शांतपणे झोपली.विठ्ठल काही झाले तरी एक आश्रित, एक अर्धपोटी हरकाम्या होता.

करंदीकर आजोबा होते म्हणून निदान घास तरी त्याला मिळत होते.

आजोबा वारल्यानंतर मात्र त्याने तेथून जायचे ठरवले. तो मला भेटायला

आला, त्या वेळी भडाभडा बोलून गेला. तो म्हणाला,""मी जाताना

उंबऱ्यापर्यंत पोहोचवायला देखील कुणी आले नाही बघ. दारात बांधलेले

कुत्रे, ते माझ्या इतक्या ओळखीचे. त्याचे खाणे-पिणे पाहणे हे तर माझे एक

कामच होते. मी त्याला अगदी छातीशी उचलून धरून दोनदा डॉक्टरकडे

नेऊन आणले होते. पण मी जात असता ते वस्सकन्् अंगावर आले आणि

त्याने माझी पँट दातात धरून टरकावली. त्यानेच मला सगळ्यांना निरोप

सांगितला,`आता तुझे इथे काही नाही. तू परका आहेस, तू चालता हो, तू

चालता हो.' पण त्या वेळी तुझ्या दादांचा मला केवढा आधार मिळाला हे

तुला माहीत नसेल.

सध्या तरी दादांचा विषय मला नको होता. अजून आमची जखम ताजी

होती. जाताना त्यांना अतिशय वेदना झाल्या. आईने आपले मन दगडाचे

केले, म्हणूनच ती शेवटपर्यंत त्यांच्याजवळ बसून राहिली. मी हॉस्पिटलकडे

गेलो की ते माझ्याकडे नुसते पाहत राहायचे. पण त्यांच्याकडून एक शब्द

यायचा नाही. आमच्यासाठी त्यांच्याकडे कसल्याच चिठ्ठ्या उरल्या

नव्हत्या.""

""आजोबा गेल्यानंतर दादांनी एक दिवस मला बोलावले आणि एक पाकीट

माझ्या हातात ठेवले. ते म्हणाले, करंदीकर आजोबांनी तुला देण्यासाठीपान नं. 61

माझ्याजवळ नऊशे रूपये ठेवले होते. कदाचित आता आपण फार दिवस

उरणार नाही, हे त्यांना समजले असावे. एकंदर परिस्थितीत यापेक्षा ते

काही जास्त करूच शकले नाहीत. एक पत्र देखील आहे बघ आत !मला

कसलीच काही कल्पना नव्हती. माझे हात थरथरू लागले. आत आजोबांची

एक चिठ्ठी मात्र होती : `माझी शेवटची भेट नऊशे रूपये.' मी नोटा मोजून

पाहिल्या, तर त्या एक हजाराच्या होत्या. दादा म्हणाले, `होय, शंभर रूपये

माझी एक भेट. कुणास ठाऊक, आपण आता केव्हा भेटू ते. धीराने वाग

आणि आयुष्यात स्वच्छ पावले टाकत जग.' मी त्यांच्या पायांवर डोके ठेवले

व झटकन निघून गेलो, माझ्या तोंडून एक शब्द येईना - शपथ ! मग मात्र

मारूतीच्या देवळात जाऊन अर्धा तास रडलो, मन मोकळे केले. ""
------------------------------------------------------------

1 comment:

chinoox said...

It is illegal to reprint published material without the publisher's consent. I request you to remove above post. I have already informed the publishers about this post.

Thanks.