Saturday, March 28, 2009

तो आणि ती

तो- काय खाऊ या?
ती- काहीही चालेल.
तो
- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?
ती
- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स येतात.
तो
- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?
ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?
ती
- काहीही चालेल..!! ..

तो
- मग आता आपण काय करू या?
ती
- काहीही. तुच ठरव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?
ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.
ती
- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..
तो
- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.
ती
- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.
तो- मग तुच सांग, काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव..!! ..

तो
- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.
ती
- काहीही. तुच ठरव. तो- बसनं जाऊ या?
ती
- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये.
तो
- ठीके.. टॅक्सीने जाऊ या मग. ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?
तो
- ठीक. चल मग, चालतच जाऊ.
ती
- किती दुष्ट तु? रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?
तो- ठीक. मग आधी जेवू या?
ती
- व्हाटेव्हर! तो- काय खाऊ या?
ती
- तुच ठरव॥!!




1 comment:

Maithili said...

Sahi. svatacha anubhav naahiye mala pan aai-babanche dialogs asech kaahise asatat.lagnaala 17 varsh poorn hounahi dialogs badalale naahiyet he maatr khare.
phakt amachyakade vaitaganaarya lokachi sankhya 2 asate evdhach.
baaki post evkam zakkas! ( pharach patalay buva he aaplyala)