रवी सीताराम पाटील - वय पस्तीशीच्या आसपास. एक ध्येयवेडा युवक. सचॊटीने काम करणारा बांधकाम करणारा व्यवसायिक (sounds Oxymoron - but true).
चार वर्षापुर्वी (२००६) रवीने पद्मश्री डॊ डी वाय पाटील - शेतकी (Agricultural) महाविद्यालयाचे बांधकामाचे contract घेवून काम करायला सुरुवात केली. दोन वर्षानंतर (२००८) काम पूर्ण झाल्यावर कामाचा मोबदला म्हणून बाकी असलेले ३२.५ लाख रुपयांचे बिल मागयला सूरवात केली. आजतागायत काहीच मिळत नाही हे बघुन रवीवर असल्येल्या विश्वासामुळे इतके दिवस थांबलेल्या पूरवठादारांचाही धीर आता संपत आलाय. त्याच्या पत्नीला त्रास आणि धमक्यांचे फोन यायला लागल्यावर आणि डी वाय पाटील संस्थेकडून आश्वासनाशिवाय काहीच हाती लागत नाही हे बघितल्यावर आता त्याने सविनय सत्याग्रहाचे हत्यार उपसले आहे.
रवी, त्याची पत्नी (जान्हवी) आणि छॊटी राजेश्वरी हे सगळं कूटूंब मागच्या दोन दिवसांपासून डी वाय पाटील महाविद्यालय - आंबी (तळेगांव, पूणे) येथे गेले सहा दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत दारात उन्हा/
पावसात उभं आहे. त्याच्या निवेदनाची प्रत मा. राज्यपाल डी वाय पाटील (त्रिपूरा), मा. ग्रहमंत्री (महाराष्ट्र), पोलीस महासंचालक (मुंबई), पूणे ग्रामिण पोलीस यांनाही देण्यात आली आहे. जर काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर २९ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचाही त्याने इशारा दिला आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच येणारेजाणारे थबकून त्यांना आवर्जून भेटतात. काही धीर देतात तर काहीजण चेष्टाही करतात.
हे सगळं बघून आणि रवीला भेटून मला काही प्रश्न पडलेत.
१. आजच्या ’बळी तो कान पिळी’ च्या युगात हे आंदोलन कितपत यशस्वी होईल.
२. गेंड्याची कातडी असलेले शिक्षणसम्राट बदलतील का?
३. जर रवीचे काही बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? आणि त्याच्या कूटुंबाचे काय? (BTW, जान्हवीचा आपल्या पतीसोबत उभे रहाण्याचा निर्णय सर्वस्वी तिचाच आहे)
Is this type of protest (& Gandhian values) relevant today ?
3 comments:
कामासाठी पैसे मागणारे राजकारणी कामाचे पैसे देतीलच असे नाही. खाजगी महाविद्यालयं ही विद्येची घरं नसून शिक्षणाचा बाजार आहेत. त्यांच्याशी तसाच सौदा केला पाहिजे.
Dear Ravi,
I appreciate your way of fighting the injustice happened to you. The Gandhiji's way of Satyagraha was, is and will be whole heartedly appreciated by the universe. You are on the right path.
Good wishes to you
Rajkarni lok satta, education dept., newspapers, media, police dept he sarva te paise diyun vikat gheu shaktat. Pan tumchya sarkhya satyavadi lokanchya mage aamhi sadaiv asnaar. You march ahead, we are always behing you.
Post a Comment