Friday, September 17, 2010

गांधीगिरी - दिवस पाचवा (भाग २)


माझी आणि रवीची भेट वेगळ्याच कारणामुळे झाली. त्याच्या आधीच त्याचे हात construction business मध्ये डी वाय पाटील संस्थेमधे पोळले होते (जे मला नंतर कळाले).

त्याच्या मूलीच्या जन्माच्यावेळेला त्याने केलेल्या SSY च्या शिबीरातून मिळालेल्या संकल्पनांमुळे आणि स्वःताच्या कल्पकतेमुळे त्याच्या मुलीला त्याने वयाच्या दुस-या वर्षीच वाचायला शिकवले होते. आज सात वर्षांची राजेश्वरी १५०० पेक्षा जास्त spellings सांगते, १०० वर देशांचे नाव-राजधानी-झेंडा सांगू शकते, आणि चौथीमधल्या मूलांच्याबरोबरीने गणिते सोडवते. हे सगळं हसत खेळत कसं शिकवावं यावर तो लहान मूलांसाठी एक activity group (school) चालवतो. माझ्या मुलीसाठी शाळा शोधत असतांना माझी आणि त्याची भेट झाली. शाळा बघितल्याबरोबर माझ्या लक्षात आले की हे पाणी वेगळंच आहे. काही मुले स्व:ताहुन वाचत होती, काही गणिते सोडवित होती काही चक्क झोपली देखील होती. शिक्षिका (जान्हवी - रवीची पत्नी) मूलांना अडचणी आहेत त्यांचाबरोबरोबर बोलून त्यांना समजावत होत्या. His school's principal is - WE DON'T TEACH, WE HELP KIDS LEARN. आज त्याच्या शाळेच्या ६ शाखा पश्चिम महाराष्ट्रात कार्य़्ररत आहेत (आणि लवकरच मूंबईत देखील चालू होणार आहे).

शाळेमधून मिळण्या-या उत्पन्नामधून त्याने पुरवठादारांची देणी परत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला खूप वेळ लागत होता. पूरवठादार थांबयला तयार नव्हते. म्हणुन गेल्या पाच दिवसांपासून त्याने हा सत्याग्रहाचा मार्ग अवलंबलाय. कोर्ट-कचेरी करण्यात आणि परीणामी वेळ, पैसा वाया घालवण्यात त्याला स्व्यारस्य नाहीये आणि त्यामूळे होणारी डी वाय पाटील संस्थेची बदनामी देखील टाळायची आहे. आजच त्याच्याशी सहज बोलतांना तो म्हणाला - मी लहान मूलांना घडवण्याचे काम करतोय आणि मी उभारलेल्या ईमारतीमध्ये मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवन्याचे काम चालू आहे. (हे सुद्धा कोर्टात न जाण्याचे एक कारण असू शकेल).


रवी आणि जान्हवी (त्यांच्या सत्याग्रह पोस्टर सह)
डी वाय पाटील इंजीनियरींग कॊलेज समोर (आंबी-तळेगाव)छोटी राजेश्वरी - तिच्या तंबूमधे अभ्यास करतांना
Posted by Picasa

4 comments:

Anonymous said...

Dear Ravi,
Have patience,the truth will always win.
Good Luck.

Anonymous said...

रवीची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायला हवी. तुमची परवानगी असेल तर मी ही माझ्या फेसबुकच्या वॉलवर शेअर करतो.

Anonymous said...

hi i am from a news channel. can u please put ur contact number here. we would like to do this story of ravi patil

Nitin H Mutha said...

Phone number of Ravi is
94235 06795