Tuesday, September 21, 2010

गांधीगिरी - दिवस सातवा (भाग ३)


सविनय सत्याग्रहाचा अजून एक (निष्फळ?) दिवस. आजचा दिवस रवीने काळा बुरखा घालून निषेध करायचा ठरवला होता.

माझा प्रश्न - असल्या प्रतिकात्मक निषेधातून काही साध्य होइल का?
रवीचे उत्तर - गेल्या सात दिवसात काहीच प्रतिसाद न मिळल्यामूळे आजचा वेगळा निषेध. आणि शेवटी आणिबाणीचा उपाय (उपोषण) आहेच की... आणि त्यामधून काहीच नाही मिळाले तरी उन्हाचा त्रास वाचतो हा काय कमी फायदा?

जवळपास ६ वर्तमानपत्रांशी संपर्क करुनही एकाने देखील बातमी दिली नाही की अधिक माहितीदेखिल करून घेन्याचा प्रयत्न केला नाही. राजकारण्यांच्या साध्या देखव्यांचा (*) गाजावाजा करण्या-या पत्रकारांना सामान्यांच्या
लढाईकडे लक्ष द्यायला वेळ नाही वाटतं.

सातवा दिवस

काळा बुरखा घालून रवी
रवीला पाठिंबादेणारे हितचिंतक.

(*) - माझा राग राजकारणी लोकांवर नसून पत्रकारांवर आहे. खालील बातम्या प्रसरीत करणारे याकडे लक्ष देतील काय
कूलरच्या थंड हवेत चार तासांचे उपोषण करणारे करुणानिधी (वेळ - सकाळी नाष्टा ते दुपारचे जेवण)

रिकामे प्लास्टिकचे टमरेल उचलण्याची जाहिरात करण्याच्या यूगात पत्रकारांकडून काही अपेक्षा ठेवणे हेच चूक आहे.

या सगळ्या गूंत्यात रविचे आणि त्याच्या परिवाराचे काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच ...... बोथट (की मेलेल्या) संवेदनावाले शिक्षणसम्राट या कडे लक्ष देतील काय.
Posted by Picasa

No comments: